शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

By admin | Updated: March 15, 2017 00:34 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात केले होते.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे आयोजन : चंद्रपुरात पार पडला कार्यक्रमचंद्रपूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात केले होते. या कार्यक्रमात ग्रामीण भागात बचत गट चळवळीमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, महाविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.यावेळी ना अहीर यांनी, महिला बचत गटाच्या वस्तुंना बाजारपेठ उलपब्ध करुन देण्यासोबतच गटाच्या चांगल्या कामकाजासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून उगेमुगे यांनी तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण अंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या नोंदणीकृत १३ लोक संचालीत साधन केंद्राअंतर्गत २ हजार ४४९ महिला स्वयसहायता बचत गटांच्या ३० हजार २८१ महिलांचे संघटन झाल्याचे सांगितले. यावेळी महिला उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)या महिलांचा गौरवउत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला, लोक संचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, सचिव, गाव प्रतिनिधी, इंटरनेट साथी, पशु साथी, कार्यालयीन व्यवस्थापक, लेखापाल सहयोगीनी यांचा फळाचे रोप, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.