शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

प्रत्येक गावात ईव्हीएमची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:09 IST

लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असून आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत कोणत्याही सामान्य मतदारांमध्ये शंका राहू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमणार यांचे निर्देश : सामान्य मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असून आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत कोणत्याही सामान्य मतदारांमध्ये शंका राहू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. चंद्रपूर येथील नियोजन भवनात आयोजित एक दिवसाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. या अंतर्गत आता प्रत्येक गावात ईव्हीएमची चाचपणी होणार आहे.या प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये समाज माध्यमांचा योग्य वापर करा. ईव्हीएमबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व अफवा पसरविणाºयापासून सतर्क करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रात्यक्षिक कालावधीचा व्हिडिओ तयार करण्यात येऊन त्यावर वेळ टाकण्यात यावी, असे सर्वांना निर्देश देण्यात आले.ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिकाचा गावनिहाय व मतदान केंद्रनिहाय वेळापत्रक तयार करण्यात यावेत, यासाठी प्रशिक्षित टीम तयार करण्यात यावी, नागरिकांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक उघड्यावर देण्यात येऊ नये, शाळा व शासकीय कार्यालयांमध्येच देण्यात यावे, ईव्हीएम व्हिव्हीपॅट का वापरला जातो, याची सविस्तर माहिती प्रत्येकाला देण्यात यावी, ज्या गावात प्रात्यक्षिक करुन दाखविल्या जाणार आहेत. त्या गावचे ग्रामसेवक, तलाठी, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, सरपंच इत्यादींनी यावेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्या.प्रात्यक्षिकांसाठी पाठविण्यात येणारी ईव्हीएम मशीन तहसीलदार यांनी स्वत: हाताळून बघितल्यानंतरच पुढे पाठविण्यात यावी, कोणत्या व्यक्तीला ईव्हीएम देण्यात येणार आहेत, याची नियुक्ती आदेश काढण्यात यावे, गावांना भेटी देण्यासाठी नोंदवही तयार करून त्यामध्ये रोजच्या रोज नोंदी करण्यात याव्यात, ईव्हीएम मशीन बाहेर कुठेही न ठेवता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात यावी.ज्या गावात मतदान केंद्र आहे, अशा गावात जाण्यासाठी रस्ते व विद्युत नसेल, त्या गावांची यादी तयार करून तसे कळविण्यात यावे. प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाºया वाहनांवर प्रशिक्षणासंबंधी पोस्टर, बॅनर लावण्यात यावे. तसेच या प्रात्यक्षिकासंबंधीची माहिती पोस्टर, बॅनर, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील, उपविभागीय कार्यालये व इतर शासकीय कार्यालयांमध्येदेखील लावण्यात यावी. प्रत्येक गावात प्रात्यक्षिक घेण्यात यावे, त्यामध्ये कोणतेही मतदान केंद्र सुटू नये, याची काळजी घेण्यात यावी, अशा वेगवेगळ्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सदर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले नाही, अशा प्रकारची तक्रार येवू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्यासह सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस.जी.समर्थ, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार यांच्यासोबत कर्मचाºयांची उपस्थिती होती.