शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दररोज होतो स्फोटाचा आवाज अन घरांना बसतात हादरे ! नागरिकांत दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 14:22 IST

नागरिक दहशतीत : भद्रावतीतील 'तो' आवाज नेमका कुठला?

विनायक येसेकर लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : मागील चार दिवसांपासून शहरात दररोज सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास दररोज स्फोटाचा आवाज होऊन घरांना हादरा बसण्याचा प्रकार घडत आहे. वेकोली आणि आयुध निर्माणीत सुर्योदयानंतर ब्लास्टिंगची कामे होत नसताना असा भयानक आवाज येत असल्याने नागरिकांत दहशत पसरली. तहसीलदार व ठाणेदारांनीही हा आवाज अनुभवला. मात्र, हा आवाज नेमका येतो कुठून, याबाबत नागरिकांत कमालीचा संभ्रम आहे.

भद्रावती शहराच्या सभोताल वेकोलीच्या खुल्या खाणी आहेत. त्यात कर्नाटक एम्टा व अरबिंदो खुली कोळसा खाणींची भर पडली. कोळसा काढण्यासाठी ब्लॉस्टिंगचा वापर केला जातो. मात्र, ब्लास्टिंग केव्हा करायचे याबाबत केंद्र सरकारचे कडक नियम आहेत. त्या नियमाचे पालन करून अशी ब्लास्टिंग केली जाते. सलग चार दिवसांपासून सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास ब्लास्टिंग होतो. त्यामुळे घराची दारे व खिडक्या हलतात. भांडे खाली पडतात. हा नेमका प्रकार काय आहे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले. खुल्या कोळसा खाणीत ब्लास्टिंग किंवा आयुध निर्माणीतील आऊटडेटेड बॉम्ब निकामी केले जात असल्याने हा प्रकार घडत असल्याची नागरिकांत मोठी चर्चा आहे. याबाबत ठाणेदार अमोल काचोरे यांना विचारणा केली असता, कुठलीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. 

या भागांत येतो भितीदायक आवाज शहरात गौतम नगर, मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा, गुरूनगर, पंचशील नगर, चंडिका वार्डातील काही भागात पहाटे ब्लास्टिंगचा मोठा आवाज येतो. या भागातील घरांना हादरे बसतात, अशी माहिती नागरिकांनी दिली. प्रशासनाने याबाबत तज्ज्ञांचे पथक गठित करून आयुध निर्माणी व वेकोली व्यवस्थापनाच्या दैनंदिन उत्पादनाशी संबंधित माहिती जाणून घ्यावी. हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत शास्त्रोक्त व खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

"पहाटे व सकाळच्या सुमारास दररोज स्फोटाचा आवाज मी देखील अनुभवला आहे. या प्रकाराबाबत आयुध निर्माणी प्रबंधकांकडे विचारणा केली. या वेळेत ब्लास्टिंग करण्याचा कुठलाही प्रकार सुरू नसल्याचे सांगितले. त्यामुळे आवाज नेमका कशाचा याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांची मदत घेऊ." - राजेश भांडारकर, तहसीलदार, भद्रावती

"खुल्या कोळसा खाणीत ब्लास्टिंगचा वापर केला जातो. मात्र सध्या खाणीत ब्लास्टिंग होत असल्याचे सांगण्यात आले. मी खुल्या कोळसा खाणीत काम करतो. ब्लास्टिंगचे एक वेळापत्रक ठरले असते. सूर्योदयानंतर ब्लास्टिंग होत नाही. ती देखील इतक्या भयंकर तीव्रतेची नसते. त्यामुळे प्रशासनाने सत्य शोधून काढावे." - राजू डोंग, उपसरपंच तथा खाण कामगार, चेक बरांज

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर