वरोरा : प्रभाग ४ येथील दत्त मंदिर व अंबादेवी वार्ड येथे विजय वस्तीस्तर बचत गट संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची व सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
तसेच यावेळी संक्रांतनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व व हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष छोटूभाई शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता भावना लांडगे, वस्ती स्थर बचत गट संघ अध्यक्ष लता हिवरकर. प्रकल्प अधिकारी उमेश कतडे. सारिका सावसाकडे. कुंभारे उपस्थित होते. यावेळी छोटूभाई शेख व भावना लांडगे व इतर मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात बचत गट संघातील, महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.