शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विषुव दिन असतानाही नसणार दिवस-रात्र एकसमान, खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा

By राजेश मडावी | Updated: September 22, 2023 16:53 IST

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याचे आवाहन

चंद्रपूर : दरवर्षी २१-२२ मार्च तसेच २२-२३ सप्टेंबर रोजी विषुव दिन असतो. याचा अर्थ सूर्य अगदी विषुववृत्तावर असतो; परंतु आपल्याकडे उत्तर गोलार्धात २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान नसते. पाठ्यपुस्तके व सर्वसामान्य माहितीप्रमाणे २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान असते, असे मानले जाते. मात्र, वैज्ञानिक दृष्टीने चुकीचे आहे, असा दावा चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला.

पृथ्वी सूर्याकडे २३.५ अंशाने कललेली असल्याने वर्षभर पृथ्वीच्या २३.५ अक्षांसावर उत्तर-दक्षिणेला दररोज जागा बदलताना दिसतो. सूर्याच्या कर्कवृत्तावरून मकर वृत्ताकडे जाण्याच्या भासमान मार्गाला दक्षिणायन आणि मकर ते कर्कवृत्ताकडे जाण्याचा मार्गाला उत्तरायण म्हटले जाते. दोन्ही मार्गक्रमणावेळी सूर्य २१-२२ मार्च आणि २२-२३ सप्टेंबरला दोनदा विषुववृत्त पार करीत असतो. त्या दिवसांना विषुव दिन-संपात दिन म्हटले जाते. २०२३ रोजी विषुव दिन २३ सप्टेंबरला दुपारी १२:२० वाजता आहे. आपण याच दिवशी दिवस-रात्र समान असते असे म्हणतो. पण, खगोल व भौगोलिकदृष्ट्या चुकीचे आहे, असा दावा प्रा. सुरेश चोपणे यांनी केला.

राज्यात केव्हा व असते कुठे दिवस-रात्र समान?

महाराष्ट्रात २८-३० सप्टेंबरला दिवस-रात्र समान असेल. २३ सप्टेंबरला राज्यात कुठेही दिवस-रात्र समान नसते. २३ ला मुंबई येथे १२.०४.३६ तासांचा दिवस व ११.५३.३४ तासांची रात्र असते. नागपूर येथे १२.०४.४१ तासांचा दिवस तर ११.५३.३३ तासाची रात्र, चंद्रपूर येथे १२.०४.३९ तासांचा दिवस, तर ११.५५.३३ तासांची रात्र, २८ सप्टेंबर रोजी नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, धुळे, जळगाव येथे दिवस-रात्र समान, २९ला मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, सातारा, सोलापूर येथे दिवस-रात्र समान, ३० सप्टेंबर रोजी कोल्हापूर व रत्नागिरी येथे दिवस व रात्र समान राहणार आहे, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.

टॅग्स :scienceविज्ञान