शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२२ एप्रिलपर्यंतचा आदेश असतानाही नाफेडची तूर खरेदी १६ पासूनच बंद

By admin | Updated: April 21, 2017 00:53 IST

मागील काही महिन्यांपासून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना ५०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता.

वरोरा : मागील काही महिन्यांपासून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना ५०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. नाफेडची तूर खरेदी २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर मात्र वरोरा येथे नाफेडने तूर खरेदी १६ एप्रिलपासूनच बंद केल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे गुरूवारी संतप्त शेतकऱ्यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तूर खरेदी ५०५० रुपये प्रति क्विंटल दराने वरोरा येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील तीन महिन्यापासून सुरू आहे. व्यापाऱ्याकडे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे तूर विकण्याकरीता पसंती दिली. परंतु, नाफेडची तूर खरेदी संथगतीने सुरू असल्याने अनेक शेतकरी नाफेडच्या लिस्टमध्ये वेटींगवर आहेत. असे असतानाही नाफेडमध्ये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी तूर नाफेडकडे आणीत आहे. केंद्र शासनाने नाफेडच्या तूर खरेदीला २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी आनंदी झाला. परंतु वरोरा येथील नाफेडची तूर खरेदी १६ एप्रिलपासून अचानक बंद केली. आधी आलेल्या तुरीचे मोजणी व नवीन खरेदी नाफेड करणार नाही, असा हेका नाफेडच्या अधिकाऱ्यांनी धरल्याने मार्केट यार्डमध्ये नाफेडच्या कर्मचाऱ्यांना संतापाला समोरे जावे लागले. सभापती विशाल बदखल, संचालक दत्ता बोरेकर, देवानंद मोरे, किशोर भलमे यांनी शेतकऱ्यांना शांत केले. (तालुका प्रतिनिधी)२१ व २२ एप्रिलला तूर विक्रीस आणावेशासनाने नाफेडला तूर खरेदीची मुदत २२ एप्रिल पर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे नाफेडला २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करावीच लागेल. यामुळे शेतकऱ्यांनी वरोरा बाजार समितीमध्ये २२ एप्रिल पर्यंत नाफेडकडे तूर विक्रीस आणावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विशाल बदखल यांनी केले आहे.२२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार तूर खरेदीची मुदत २२ एप्रिलपर्यंत आहे. दोन दिवस सुट्टया असल्यामुळे खरेदी झाली नाही. दररोज दोनशे क्विंटल तूर खरेदी करण्यात येत आहे. २२ एप्रिल पर्यंत तूर खरेदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.- कुमार स्वामी, नाफेड अधिकारी.