शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही कुरोडा गाव रस्त्याविना

By admin | Updated: January 9, 2016 01:30 IST

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही तालुक्यातील कोंढा-घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गटग्रामपंचायत कुरोडा गावाला आजपर्यंत रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही.

वन विभागाची आडकाठी : जिल्हा परिषद सदस्याचा उपोषणाचा इशाराभद्रावती : स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही तालुक्यातील कोंढा-घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गटग्रामपंचायत कुरोडा गावाला आजपर्यंत रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. मागील अनेक वर्षांपासून सतत मागणी करून तसेच आवश्य कागदपत्रांची पूर्तता करूनसुद्धा याकडे वनविभाग जाविणपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी केला आहे. लवकरात लवकर कुरोडाकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या न सोडविल्यास वन विभागाच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जि.प. सदस्य विजय वानखेडे यांच्यासह कुरोडाचे उपसरपंच, सदस्य व ग्रामवासियांनी दिला आहे.भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे पक्का रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी मागील तीन वर्षापासून पत्रव्यवहार करून आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटी पुर्ण करण्यात आल्या. अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ मधील कलम ३ (२) (०) मध्ये केवळ वन जमीन असेल तर अशा जमिनी खुल्या करण्यात येईल असे स्पष्ट नमुद असुन सुद्धा याकडे वनविभागाकडून टाळाटाळ केल्या जात आहे.१० सप्टेंबर २०१२ ला सदर गटाचे अधिकार अभिलेखांनी व सातबारा नकाशा नुसार तसेच उपलब्ध दस्ताऐवजानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती, संबंधीत क्षेत्र सहायक भद्रावती व बिट वनरक्षक भद्रावती तसेच जि.प. बांधकामाचे उपअभियंता तसेच कुरोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी स्थळाची पाहणी केली असता जुना क्र. ९६ क्षेत्र २०६.६५ एकर असुन मोठ्या झाडांचे जंगल असे नमुद आहे. तसेच सदर गट हा वनविभागाचे अख्यत्यारित नाही. परंतु नमुद गट हा वनविभागाच्या अखत्यारित नसला तरी जंगल या सरीत येते. त्यामुळे या गटास वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदी लागू होत असताना सदर गट हा वन या संज्ञेत मोडत असल्याने संबंधित सदर क्षेत्रापैकी एक हेक्टरच्या आत क्षेत्र अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम वरीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला असताना सुद्धा वनविभाग कायद्याअंतर्गत कार्यवाही झालेली असतांना सुद्धा या कामास दिरंगाई होत आहे. (तालुका प्रतिनिधी)