शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:29 IST

पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.

ठळक मुद्देओव्हरफ्लोची झलक : पर्यटकांची मांदियाळी, नैसर्गिक सौंदर्य डोळे दीपवणारे

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.नागभीड-चंद्रपूर राज्य महामार्गापासून ५ किमी तर नागभीडपासून ९ किमी अंतरावर हे स्थळ आहे. अतिशय मनोवेधक अशा गर्द वनराईने नटलेल्या जंगलातील रस्त्याने या तलावावर जावे लागते. जवळपास पाच किमीचा हा रस्ता आहे. पाच किमीच्या प्रवासात अनेक छोट्या-मोठ्या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांसाठी पर्वणीच असते. यानंतर दर्शन होते ते विशाल अशा घोडाझरी तलावाचे.तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांमध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. जेव्हा इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन हा मुख्य हेतू होता. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिंचनासोबतच पर्यटन हा हेतुही मोठ्या प्रमाणावर साध्य होत आहे. पर्यटनासाठी घोडाझरीची भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याने येथे येणारा पर्यटक दिवसभरासाठी या स्थळाच्या मोहात पडतो. घोडाझरीच्या नव्या व्यवस्थापनाने याठिकाणी विविध सोयी पर्यटकांचा उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्यांचा आनंद आणखीच द्विगुणीत होत आहे.घोडाझरीतील या निसर्गसौंदयार्चा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात. परंतु, घोडाझरीने आपली ओळख पावसाळी पर्यटनासाठीच निर्माण केली आहे. घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला की, ते नितळ नैसर्गिक देखावे, तो विशाल तलाव , तलावाभोवतीच्या त्या हिरव्या गर्द वनराईचे थबथबलेले विहंगम दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी आणि त्याचबरोबर सांडव्यावरून पडणाºया फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डूंबण्यासाठी विदर्भातील अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत असतात.पाच वर्षे दिली हुलकावणीसन २०१३ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर पूरेशा पावसाअभावी हा तलाव ओव्हरफ्लो झालाच नाही. तब्बल पाच वर्षांनी म्हणजे रविवारी हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होतो की नाही, अशी शंका पर्यटकांमध्ये होती. मात्र डोंगराच्या झरपट्याने घोडाझरी तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणीसुद्धा फेकले जात आहे. दरवर्षी १५ आॅगस्टला या ठिकाणी मोठी गर्दी असते. आता ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांना आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणtourismपर्यटन