शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ज्ञानाच्या कक्षा वाढवा- मुनगंटीवार

By admin | Updated: August 17, 2015 00:49 IST

ज्ञानामुळे जग अधिकाधिक समृद्ध होत आहे. विज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे.

बल्लारपूर : ज्ञानामुळे जग अधिकाधिक समृद्ध होत आहे. विज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. त्याचे मूळ ज्ञान आणि जिज्ञासा हे आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्या ज्ञानात अधिक भर कशी घालता येईल, याबाबत प्रयत्नशील राहावे. प्रगतीचा टप्पा गाठून स्वत:चा, सोबतच समाज व पर्यायाने देशाचा विकास साधावा, असे मोलाचे मार्गदर्शन राज्याचे वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील जव्हेरी विद्यालयातील विद्यार्थिनीना केले. या विद्यालयात ५०० विद्यार्थिनींना गणवेश तसेच काही विद्यार्थिनींना बॅगचे वाटप झाले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून मुनगंटीवार बोलत होते.अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रवींद्र भागवत होते. आ. संजय धोटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी, संस्थेचे पदाधिकारी इब्राहिम जव्हेरी, इब्राहिम जैनुद्दीन जव्हेरी, पोलीस निरीक्षक नरुमणी टांडी, शिवचंद द्विवेदी, अजय दुबे, मुख्याध्यापिका संध्या बोबडे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार यांनी शासनाचे असलेले शैक्षणिक धोरण याबाबतही सांगितले. अ‍ॅड. भागवत यांनी दोन कथा सांगून समाजाकरिता त्यागाची भावना बाळगण्याबाबत मार्गदर्शन केले.प्रास्ताविक जैनुद्दीन जव्हेरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भाग्यश्री आमटे, सुरेखा चंदेल, सुनिता कांबळे व मृणाल मोरे यांनी करुन दिला. संचालन सुजाता घट्टूवार यांनी केले तर आभार नंदा वंगलवार यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)