शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

लंच ब्रेकच्या ‘त्या’ आदेशामुळे सामान्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:51 IST

शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या तासातच करावे लागणार भोजन : कार्यालयीन वेळेतील सामूहिक भोजनाला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारी एक ते दोन दरम्यान अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालया व्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारची जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबंध असलेल्या कार्यालयात सर्वसामान्य लोक तक्रारी व गाºहाणी घेऊन येतात. तेव्हा बरेचदा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा केल्यास जेवणाची वेळ असल्याचे सांगण्यात येत होेते. विविध सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाची वेळ कार्यालयाच्या सोयीने ठरवली जाते. त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ निश्चित करण्याचा सरकारचा विचार होता, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.पालिका, पंचायतमध्येही लागू करावानगरपालिका, पंचायत समिती, महावितरण, टपाल कार्यालय, कृषी कार्यालय आदी अनेक सरकारी कार्यालयात दुपारी १ ते ३ या वेळेत अधिकारी कर्मचारी दिसत नाही. सोहब जेवायला गेले, ही नेहमीची सबब सांगितली जाते. विशेष म्हणजे, दुपारी १ ला घरी जेवायला गेलेले अनेक कर्मचारी थेट ड्युटी संपतेवेळी येतात. सर्वशासकीय कार्यालयाची हिच स्थिती आहे. त्यामुळे नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी कितपत होते, हे काही दिवसातच कळणार आहे.विभागप्रमुखांना घ्यावी लागणार दक्षतानवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसाठी दुपारच्या भोजनासाठी दुपारी १ ते २ या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाही, याची कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जारी केले.