शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या तहसील क्वॉर्टरवर अतिक्रमण

By admin | Updated: May 24, 2015 01:49 IST

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी आपलीच शासकीय संपत्ती वाचविण्यात असमर्थ ठरत आहे.

बी.यू. बोर्डेवार राजुराराजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी आपलीच शासकीय संपत्ती वाचविण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे शासकीय मोकळ्या जागेवर तर सोडाच क्वॉर्टरमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे राजुराचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आपलीच जागा वाचविण्यात असमर्थ ठरत आहे. ज्यांच्या काळात सर्वे क्रमांक १४९ मध्ये अतिक्रमण झाले, त्या शासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्या अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजुरा शहरातील इंदिरानगर परिसरातील तहसील कार्यालयाच्या मालकीची जागा व क्वॉर्टरमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे.एक कोटीपेक्षा अधिक किंमत असलेली जागा व क्वॉर्टर ही शासकीय संपत्ती आहे. त्याचेच संरक्षण शासकीय अधिकारी करू शकत नसतील तर सामान्य नागरिकांच्या संपत्तीचे रक्षण ते कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजुरा शहरामध्ये मागील १० वर्षांपासून राजुरा तहसील कार्यालयाचे क्वॉर्टर असून या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचारी वास्तव्याला होते. परंतु कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान सोडून आपआपली घरे बांधली. काही किरायाने राहत आहेत. मात्र याच संधीचा फायदा घेऊन येथील काही लोक शासकीय निवासस्थानात अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहेत. शहरातील १०० कोटीच्या जमिनीवर धनदांडग्यानी अतिक्रमण केले. परंतु शासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे. दोन वर्षांपासून एक कोटीची शासकीय संपत्तीवर अतिक्रमण झाले, याची जाणिव तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना आहे. परंतु यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. याउलट गरिबांच्या झोपड्या पाडण्यात मात्र येथील अधिकारी मोठी तत्परता दाखवित आहे.राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मधील वैभवशाली तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. येथील काही नगरसेवकांनी आपल्या मतांच्या राजकारणासाठी या नागरिकांना आश्रय दिला. त्यामुळे शासकीय संपत्ती या अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केली. तलावाच्या जुना नकाशाचे अवलोकन केल्यास या तलावात किती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे, हे लक्षात येईल. पैशासाठी वाट्टेल ते युक्त्या भूखंड माफिये लढवत आहेत. यामध्ये काही शासकीय अधिकारीसुद्धा गुंतलेले आहे. येथील काही माफिये पैशाने आम्ही अधिकारी विकत घेतो या गुर्मीत असले तरी या माफियांची गुर्मी उतरविणारा अधिकारी अद्यापपर्यंत राजुऱ्यात आलेला नाही. तहसील कार्यालयाने अगोदर स्वत:ची जागा वाचवावी-पारोमिता गोस्वामीराजुरा शहरातील शासकीय भूखंड व शासकीय निवासस्थांनावर झालेल्या अतिक्रमणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, अगोदर तहसीलदार, एसडीओ यांनी स्वत:च्या तहसील अंतर्गत असलेले शासकीय निवासस्थान वाचवावे, मोठे अतिक्रमण काढावे नंतरच गरीबांच्या झोपड्याना हात लावावा. असे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.