शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ अतिक्रमित जमीन वन विभागाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:36 IST

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील अतिक्रमित जमिनीचा ताबा न्यायालयाने वन विभागाला दिला.

ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश : वन विभागाकडून विसापूरच्या जागेवर रोपवन सुरू

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील अतिक्रमित जमिनीचा ताबा न्यायालयाने वन विभागाला दिला. परिणामी या जागेवर आता वन विभागाने रोपवनाचे काम सुरु केले आहेविसापूर गावाजवळील जुना भूमापन सर्वे क्रमांक ३०५/१, नवीन सर्वे क्रमांक ४५९/१ या वनविभागाचे जागेपैकी २ हेक्टर जागेवर देवकुमार बुध्दलाल धामणे यांनी अतिक्रमण केले होते. याशिवाय अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, संयुक्त दिवाणी न्यायाधिशांनी (वरिष्ठ स्तर) ही जमीन वनविभागाची असल्याचा आदेश जारी केला आहे. संबंधित जमीन प्रकरणातील प्रतिवादी मध्य चांदा उपवनसंरक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार उपवनसंरक्षक यांनी प्रस्ताव सादर केला होता. ही जागा वनविभागाची असून वनखंड क्र ५७९, जुना सर्वे क्र ३०५/१ आणि नवीन सर्वे क्र ४५९/१ मधील दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात सुरू होता. परंतु, सदर प्रकरण ठरवून दिलेल्या शासन निकषात बसत नसल्यामुळे वादी देवकुमार धामणे यांची मागणी अमान्य करून प्रकरण निकाली काढण्यात आले. प्रकरणाचा निकाल वनविभागाच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेत डिसेंबर २०१७ पासून नवीन रोपवन घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणात शासनाकडून अधिवक्ता शरद आंबटकर यांनी काम बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय वनविभागाच्या बाजूने लागल्याने या ठिकाणी रोपवनाचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती मध्य चांदा उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी दिली आहे. चंद्रपूर वनविभागाने विविध पुराव्यांचा आधार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे रोपवनासोबतच बॉटनिकल गार्डनच्या कामाला सुरुवात झाली आहे.