शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वनप्रकल्प सक्षम

By admin | Updated: October 5, 2014 23:02 IST

व्यावसायिक उपक्रमासाठी वनविकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली. ९०० चौ. किमी वनक्षेत्र वनप्रकल्पाच्या ताब्यात आहे. आजपर्यंत हजारो हेक्टरवर उत्कृष्ठ रोपवन करुन उच्च दर्जाचे वन तयार करण्याचे

कोठारी : व्यावसायिक उपक्रमासाठी वनविकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली. ९०० चौ. किमी वनक्षेत्र वनप्रकल्पाच्या ताब्यात आहे. आजपर्यंत हजारो हेक्टरवर उत्कृष्ठ रोपवन करुन उच्च दर्जाचे वन तयार करण्याचे काम वनप्रकल्पाने केले आहे. सोबतच वनसंवर्धन व संरक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. मानव व वन्यजीवांत संघर्ष निर्माण झाल्यास वन्यजीवांच्या संरक्षणाकडे महामंडळाची उदासीनता असल्याची टीका होते. मात्र वन संरक्षणासोबत वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वनविकास महामंडळ सक्षम असल्याचे मत मार्कडा वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक पी. आर. धावडा यांनी व्यक्त केले. वन्यजीव सप्ताहानिमित्त कन्हारगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.१ ते ७ आॅक्टोबरला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी मध्ये चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह यांच्या विद्यमाने कन्हारगाव येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव सप्ताहा साजरा करण्याची गरज काय, याबाबत जनतेला जागृत करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या,शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहिती देण्यात आली. विभागीय व्यवस्थापक एम. एस. फारुखी, पश्चिम वनप्रकल्प चंद्रपूरचे विभागीय व्यवस्थापक एस. एस.सावकर, मानद वन्य जीव संरक्षक उदय पटेल, मुकेश भांदककर, सहायक व्यवस्थापक एम. डी. सातपुते, सुरेश रंगारी व राजू जुनघरे यांची उपस्थिती होती. मान्यवरांची वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी संवर्धनासाठी मानवाने काय करायला हवे याबाबत विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी वन्य प्राण्यांमध्ये वाघाचे महत्व विषद करण्यात आले. तृणभक्षी, मासभक्षी प्राणी, जंगलातून प्राप्त होणारे विविध पाने , फुले व फळे यांचे मानव जीवास किती महत्व आहे याचे उदाहरण देवून वन्यजीवांचे अधिवासास धोका निर्माण होवू नये याकरिता सतत जागरुक राहावे, असे मत उदय पटेल यांनी व्यक्त केले. संचालन वनपाल चिंतलवार, प्रास्ताविक व आभार वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांनी मानले. (वार्ताहर)