शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या सदनिका ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:39 IST

कोरपना तालुक्यातील सोनूर्ली या गावालगत पाठबंधारे विभागामार्फत सदनिका बांधण्यात आली.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : दरवाजे, खिडक्या चोरीला, जनावरांचा वावर

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवारपूर : कोरपना तालुक्यातील सोनूर्ली या गावालगत पाठबंधारे विभागामार्फत सदनिका बांधण्यात आली. मात्र मागील अनेक वर्षांपासून ही सदनिका दुलक्षित असल्याने व येथे कुणीही वास्तव्यास नसल्याने येथे जनावरांचा वावर वाढला आहे.‘कुणी घर देता का घर’ असे नटसम्राट या कादंबरीतील डायलॉग प्रसिद्ध आहेत. अनेकांना राहण्यासाठी घर नाही. छताखाली राहण्यास रात्रंदिवस गरिब नागरिक कष्ट करतात. राबराब करूनही अनेकांचा नशीबी घर नसते. अनेकांचे जीवन उघड्यावर संपताना दिसते. मात्र उलट प्रचिती सोनूर्ली या गावालगत दिसून येते.कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधून येथे अनेक वर्षे झाली. मात्र या सदनिकांमध्ये आता जनावरांचे वास्तव्य दिसून येते. पकडीगुडम धरण प्रकल्पाकरीता पाठबंधारे विभागाने १९९०-९२ मध्ये अधिकाºयांच्या निवासाकरिता सदनिका बांधून देण्यात आल्या होत्या. कर्मचाºयांकडून काही दिवस या सदनिकांचा उपभोग झाला. मात्र नंतर या सदनिका रिकामेच पडले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते अनेक कर्मचारी गडचांदूर, राजुरासारख्या मोठ्या शहरात वास्तव्यास असल्याने सदनिकांचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येते.शासनाचा लाखो रुपयांचा खर्च व्यर्थपाठबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारी वर्गाना त्यांचा सोयीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून उत्तम अशा सदनिका बांधून दिल्या. मात्र सदनिका आता मोडकळीस आल्या आहेत. सदनिकांना लाखो रुपयांचे लोखंडी तारेची सुरक्षा भीत होती. मात्र ती भुरट्या चोरट्यांनी लंपास केली. त्यासोबतच सदनिकांना लावण्यात आलेले दरवाजे, खिडक्या व इतर काही लोखंडी सामानही लंपास झाले आहे.भुरटे निवासीसदनिका गावापासून २ किमी अंतरावर असल्याने व तेथे कुणीही राहत नसल्याने तिथे गावकरी जात नाहीत. याचाच फायदा घेत भुरटे मात्र त्या सदनिकांचा पुरेपूर फायदा घेत असून रात्रीच्या वेळी तिथे तळ ठोकुन असतात.सदनिका भाड्याने देण्याची मागणीगोरगरीब लोकांना राहण्यासाठी घर नाहीत. असे कित्येक लोक छताविना आपले घर उघडयावर चालवत असतात. त्यामुळे गोर गरिबांना या सदनिका भाडे तत्वावर किंवा कायमस्वरूपी देण्याची मागणी होत आहे.पकडीगुडम धरण येथील सेक्शन घोषित न झाल्याने कर्मचारी संख्या अजूनही ठरलेली नाही. गडचांदूर येथे आमची कॉलनी असल्याने आम्ही येथे राहतो.- ए. आय. सैय्यद, प्रभारी प्रमुख अभियंता.