नाना श्यामकुळे यांचे प्रतिपादन : क्रांतिदिनी चंद्रपुरात निघाली तिरंगा यात्रा चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढा दिला. वेळप्रसंगी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या प्रयत्नामुळेच भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात करावे, असे आवाहन आमदार नाना शामकुळे यांनी मंगळवारी भाजपातर्फे आयोजीत तिरंगा यात्रा कार्यक्रमाप्रसंगी केले. स्वातंत्र्यापूर्वी ९ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरुद्ध चले जाव आंदोलनाची सुरवात झाली. त्याला ७५ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कारागृहात क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या स्मारकास आमदार नाना शामकुळे यांनी पुष्पमाला अर्पण केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, नगरसेवक अनिल फुलझेले, नगरसेविका अंजली घोटेकर, नगरसेविका वनश्री गेडाम, नगरसेविका मायाताई उईके, राजेंद्र अडपेलवार, नगरसेवक धनंजय हुंड, मोहन चौधरी, रघुवीर अहीर, ललीताताई गराड, सुषमा नागोसे, देवानंद वाढई, रवी गुरनूले, तुषार सोम, जितेंद्र धोटे, प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर हुतात्मा स्मारक येथे पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपायुक्त इंगोले, मनपाचे अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी हजर होते. तिरंगा यात्रा प्रमुख मागार्ने निघाली. यात शेकडो मोटारस्वार सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)मोबाईल सेवा ठरतेयं कुचकामी पेंढरी (कोके) : सिंदेवाही, चिमूर तालक्यातील ग्रामीण भागात मोबाईल कंपन्यांनी जाळे पसरविले आहे. मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईल सेवा ढेपाळली आहे. कंपन्यांनी आपल्या टोॅवरची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करा
By admin | Updated: August 10, 2016 00:34 IST