शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार

By admin | Updated: September 28, 2016 00:58 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा काढला.

अभाविपच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा : मागण्या पूर्ण न झाल्यास करणार तीव्र आंदोलनचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा काढला. विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेमुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक अन्याय होत असून तो त्वरीत दूर करावा, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून विद्यापीठाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. परीक्षेचे नियोजन, निकाल, पेपर तपासणी, परीक्षा शुल्कात वाढ इत्यादी बाबींचा यात समावेश आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, याची दखल घेण्यात न आल्याने अभाविपच्या वतीने विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे जिल्हा संयोजक रघुवीर अहीर, क्षेत्रीय सहसंघटकमंत्री सुरेंद्र नाईक यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. रघुवीर अहीर, सुरेंद्र नाईक यांनी मोर्चातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच विद्यापीठाच्या पेपर तपासणीत मोठा घोळ झाला आहे. यासाठी पूनर्मूल्यांकनाकरिता अर्ज करण्याच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही विद्यापीठाकडून मात्र यावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. हे अन्यायपूर्ण असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मोर्चात सौरभ कावळे, रवी बनकर, मयूर झाडे, सूरज पेद्दुलवार, राहुल ताकधट, सचिन बल्की, गणेश नक्शीने, जीव वैद्य, ललित होकम, वैभव मंगरुडे, प्रविण गिरडकर, रमाकांत ठाकरे, गौरव, होकम, आकाश सातपुते, शुभम दयालवार, यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)कुलगुरुंना दिले मागण्यांचे निवेदनविद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन कुलगुरु डॉ. कल्याणकर यांना सादर करण्यात आले. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी मागण्यांवर गंभीरपणे विचार करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.