शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

चिचाळ्यातील महिलांचा अवैध दारूविरोधात एल्गार

By admin | Updated: December 22, 2016 01:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुविक्री बंद करण्यात आली. तरी मूल तालुक्यातील चिचाळा येथे अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

एका दिवशी डझनभर दारुविक्रेत्यांना अटक : अनेक दारुविक्रेतचे भूमीगत भेजगाव: चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुविक्री बंद करण्यात आली. तरी मूल तालुक्यातील चिचाळा येथे अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात महिला, युवक व आबालवृद्धासह अल्पवयीन मुलेही दारुविक्रीत गुंतले आहेत. त्यामुळे गावाची शांतता भंग पावत आहे. त्यामुळे महिलांनी अवैध दारुविक्रीसाठी सरसावल्या आहेत. अवैध दारुविक्री रोखण्यासाठी गावात दवंडी देऊन तंटामुक्त समिती व महिला मंडळाची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत गावातील दारुबंदी झाल्यास महिला बचत गटांना पालकमंत्र्यांच्या निधीतून अनुदान मिळणार असल्याचे महिलांना सांगण्यात आले. त्यामुळे महिलांनी आक्रमक होत तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत व युवकांच्या सहकार्याने अवैध दारुविक्रेत्यांच्याविरोधात धाडसत्र सुरु केले आले. यात तब्बल बारा अवैध दारु विक्रेत्यांना जेरबंद करुन लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर काही दारुविक्रेत्यांनी कारवाईच्या भितीपोटी गावातून पळ काढून भूमिगत झाले आहेत. यावेळी अरुण ऋषी चलाख, निलेश वासुदेव कोठारे, बाबू झुंगा चलाख, ताराचंद सुकरु चलाख, वर्षा दशरथ चलाख, सुधीर दशरथ दुधबळे, मारोती विलास कोठारे, यांना दारुसह पकडून पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने गावात दारुविक्री वाढली होती. त्यामुळे महिला वर्गानी पकडलेला दारुसाठा ग्रा.पं. समोर जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली. चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे प्रणेते म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी दारुबंदीच्या घेतलेल्या निर्णयाने महिला सुखावल्या होत्या मात्र पालकमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रातील मंत्र्यांनीच दत्तक घेतलेल्या चिंचाळा गावातील दारुच्या महापुराने महिला संतापल्या आहेत. सदर महिला मंडळामध्ये चिचाळा येथील सरपंच सुषमा सिडाम, उपसरपंच यशवंत चलाख, तंटामुक्त समिती अध्यक्ष वासुदेव बुरांडे, पोलीस पाटील विजय दुर्गे, संगीता चलाख, कुंदा लेनगुरे, गिता उडाण, सुमन लेनगुरे, लता भेंडारे, पुजा सोनुले, अंतकला जेंगठे, माया यापाकुलवार, रंजना सोनटक्के, माधुरी मंकिवार, सरीता कोंतमवार, सारीका रेड्डीवार, पार्वता भेंडारे, प्रविण सिडाम, संजय गेडाम, विलास भुरसे, भाऊराव बागेवार आदींनी सहकार्य केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोहर कोरेही, शेंडे कुळमेथे, कुमरे, बल्की आदींनी कारवाई करुन दारुविक्रेत्यांना जेरबंद केले. ( वार्ताहर)