शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकरापैकी आठ सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:41 IST

मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे नदी, नाले, तलावही भरले : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील सिंचनाचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकºयांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकºयांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. अशातच जुलैच्या अखेर तीन दिवसांपासून आतापर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. आठ सिंचन प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत.सिंचन प्रकल्पातील जलसाठाचंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर या आठ प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प सद्यस्थितीत ओव्हरफ्लो झाले आहेत. तर अमलनाला प्रकल्पात ८४.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ७८.४७ टक्के, लालनाला प्रकल्पात ८८.७१ टक्के जलसाठा आहे. असा पाऊस पडत राहिला तर हे प्रकल्पही ओव्हरफ्लो होतील.मामा तलावही तुडुंबचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. हे सर्व तलाव आता शंभर टक्क़े भरले आहेत.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरण