शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

शेतात वीज तारा, खांब कोसळल्याने कामे अडली

By admin | Updated: June 17, 2017 00:37 IST

येथून जवळच असलेल्या केम येथे दोन दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या शेतात वीज तारा व खांब कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कटेमुर्डा : येथून जवळच असलेल्या केम येथे दोन दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या शेतात वीज तारा व खांब कोसळले. मात्र वीज कंपनीने अद्यापही वीज तारा व खांब उचललेले नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची अनेक कामे अडली आहेत. शेतात पडून असलेल्या वीज तारा व खांब हटविण्यात यावे म्हणून तरी शेतकरी वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता शंकर देवगडे व त्याचे सहाय्यक कर्मचारी, लाईनम यांच्याकडे उंबरडे झिजवित आहेत. मात्र ते दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. केम येथील शेतकरी श्रीहरी दातारकर यांच्या वहिवाटीच्या शेतातून टेमुर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून विद्युत तारा गेल्या आहे. मात्र वादळी पावसाने केम शेतशिवारातील अनेक विद्युत खांब व तारा कोसळून पडल्या. श्रीहरी दातारकर यांच्या शेतात दोन खांब व विद्युत तारा कोसळून असून मशागतीची व पेरणीची कामे अडली आहेत. या संदर्भात वरोरा वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता देवगडे यांच्याशी भ्रमध्वणी वरुन संपर्क साधला असता, आपल्याला अनेक कामे आहेत, असे सांगून उडवाउडवीचे उत्तर दिले. याकडे वीज कंपनीने लक्ष न दिल्यास मोठ्या अपघाताची शक्यता असून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ३३ केव्ही असूनही विजेचा लंपडावचंदनखेडा : येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र असून सुद्धा महिनाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. २४ तासात वीज कितीदा जाईल, हे सांगणे कठीण झाले असून उकाड्यासोबतच इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. विद्युत सेवा बाबतीत काही वर्षांपूर्वी वीज विभागाच्या विरोधात नागरिकांनी आमरण उपोषण केले होते. त्याचे फलित म्हणून चंदनखेडा येथे ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले. परंतु आजतागायात विद्युत सेवा योग्यरित्या मिळत नसल्याची ओरड आहे. मे-जून महिन्यात विजेच्या लंपडावाने कहरच केला. वादळी पाऊस झाला की रात्र अंधारातच काढावी लागते. याचा परिणाम व्यावसायिकांसोबतच नळ पाणी पुरवठाला बसत आहे. चंदनखेडा संसद आदर्श ग्राम असूनही ही समस्या निर्माण झाली आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून ही समस्या त्वरीत निकाली काढावी व नागरिकांना वीज सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य चौधरी यांनी केली आहे.उन्हाळ्यात उच्च तापमानामुळे इन्सूलेटर कमजोर होतात. त्यात पावसाचा मारा झाल्याने इन्सूलेटर तडकून फूटतात. फुटलेले इन्सूलेटर (पंचर) स्पष्ट दिसून येत नाही. या कारणामुळे साधारणत: एक तासाचा ब्रेक डाऊनचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही दिवसातच ही समस्या निकाली होईल. - के. एन. मेश्राम, कनिष्ठ अभियंता, चंदनखेडा.