शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

विरुर परिसरात विजेचा लपंडाव

By admin | Updated: August 17, 2015 00:48 IST

राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) व परिसरात मागील कित्येक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे.

विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) व परिसरात मागील कित्येक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विजेचा कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत असून काही उपकरणे जळाल्याची माहिती आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विजेचा खेळखंडोबा सुरु असून नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे.सध्या सणसुदीचे दिवस आहेत. नागपंचमी, रक्षाबंधन यांच्यासह अनेक सण एका पाठोपाठ येत असून हे सण नागरिक साजरे करण्याचा मनस्थितीत असताना रात्रंदिवस वीज खंडीत होण्याचे प्रकार विरुरसह परिसरातील गावात घडत आहे. हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असून या भागात बहुतांश आदिवासी जमात वास्तव्याला आहे. अंधाराचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी विरुर पोलीस ठाण्यावर सन १९९७ ला हल्ला चढविला. तसेच सन २००४ ला माकुडी या रेल्वेस्थानकावर जाळपोळ करण्यात आली. तेव्हापासूनच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील एका महिन्यापासून वीज पाच मिनीटे राहते तर अर्धा तास जाते. वीज किती वेळा जाते अन कितीवेळा येते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे ओलीत करणारे शेतकरी वर्गसुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अलिकडे तर १२ तासाचे भारनियमन होत असल्याचे जाणवते. विजेवर चालणारे उद्योगधंदे प्रभावित झाले आहे. लहान आटाचक्की, कांडप केंद्र, एसटीडी केंद्र, इंलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकणारे व दुरुस्ती करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील वीज पुरवठा नसल्यासारखाच असतो. मात्र वीज देयके तेवढेच. विरुर येथे २२० केव्ही व ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. परंतु स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच स्वत:च्या सोईसाठी अधिकारी वर्ग व कर्मचारी बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात. त्यामुळे वीज सेवा खंडीत झाल्यास वीज कर्मचाऱ्यांची चतकोराप्रमाणे वाट बघत राहवे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते. विरुरात दोन वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. परंतु त्यातील एक वीज कर्मचारी विद्युत पोलवर चढून काम करु शकत नाही. वीज कर्मचारी दारूच्या आहारी जाऊन तुल्ल असतात. त्यामुळे अडचण पुन्हा वाढली आहे. त्यांच्याकडून काम करुन घेणे धोक्याचे असते.विजेच्या लपंडावामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. विरुर परिसरात विजेचा लपंडाव थांबवावा व कनिष्ठ अभियंता तसेच वीज कर्मचारी मुख्यालयी रहावे, अशी मागणी जि.प. सदस्य अविनाश जाधव, भिमराव अंगलवार, अशोक जयस्वाल, बंडू रामटेके, मंगेश मडावी, रवी होरे, मारोती पोटे, सर्वानंद वाघमारे, संतोष मेडपुरवार, अरुण चौधरी, बापू धोटे आदींनी केली आहे. (वार्ताहर)