शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 23:47 IST

वास्तविक या निवडणुका नोव्हेंबर महिन्यातच होणार होत्या. ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेधही लागले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन या निवडणुकांना  स्थगिती दिली होती. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे प्रशासक नेमण्याची नुकतीच कार्यवाहीसुद्धा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यातील त्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. उल्लेखनीय असे की, या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती.वास्तविक या निवडणुका नोव्हेंबर महिन्यातच होणार होत्या. ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेधही लागले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन या निवडणुकांना  स्थगिती दिली होती. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे प्रशासक नेमण्याची नुकतीच कार्यवाहीसुद्धा करण्यात आली.तालुक्यातील मिंथूर, चिखलगाव, मांगली अरब, गिरगाव आणि गोविंदपूर या ग्रामपंचायती निवडणुकीस पात्र होत्या. या ग्रामपंचायतींची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाली. म्हणूनच या निवडणुकीला घेऊन या गावांमध्ये चावडीवर गप्पा रंगायला लागल्या होत्या. गावात उमेदवारांचे पॅनलही तयार करण्यात येत होते.मागील वेळेस या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट झाली होती. याहीवेळेस येथील सरपंचांची निवड थेट पद्धतीनेच होणार आहे. प्राप्त माहितीनुसार मिंथूरचे सरपंचपद अनु.जातीच्या महिलेकरिता राखीव आहे. चिखलगाव अनु.जमाती महिला, मांगली अरब अनु.जमाती महिला, गिरगाव सर्वसाधारण महिला तर गोविंदपूरचे सरपंचपदही सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. यादृष्टीने योग्य उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली होती. मात्र, आता या सर्व उत्साहावर विरजण पडले होते. तालुक्यात राजकीयदृष्ट्या ज्या काही महत्त्वाच्या ग्रामपंचायती आहेत, त्यात या पाचही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. म्हणूनच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींकडे तालुक्यातील राजकीय पक्षांचेही लक्ष लागून होते. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक