शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ प्रतिनिधींची निवडणूक शांततेत

By admin | Updated: September 17, 2014 23:41 IST

गोंडवाना विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी आज बुधवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे १३ महाविद्यालयात

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी आज बुधवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे १३ महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी निवडून आलेत.वरोरा- गोंडवाना विद्यापिठ गडचिरोलीच्या वतीने आज वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालय व आनंद निकेतन महाविद्यालयात विद्यापिठ प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली. त्यात लोकमान्य महाविद्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा तर आनंद निकेतन महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचा उमेदवार विजय झाला.लोकमान्य महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कला शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी अमोल भोंडा यांनी आपल्या उमेदवाराचा चार मतांनी पराभव केला. आनंद निकेतन महाविद्यालयात राष्ट्रवादी शिवसेना युतीचे कला शाखा प्रथम वर्षाचे विद्यार्थी उत्तम वाघ यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ७ मतांनी पराभव केला. विजयी उमेदवाराची रॅली काढण्यात आली. लोकमान्य महाविद्यालयातील विद्यापिठ प्रतिनिधी निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सुर यांच्या मार्गदर्शनात प्रशांत उलमाले, राहुल बालमवार, राहुल खारकर आदींनी सहभाग घेतला.गडचांदुरात एनएसयुआयचा कब्जागडचांदूर येथील शरद पवार महाविद्यालय येथील विद्यार्थीनी प्रियंका भगवान नगराळे हिची विद्यापिठ प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये एन.एस.यु.आय. चे तालुका अध्यक्ष रोहित शिंगाडे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकली व चार वर्षानंतर येथे एन.एस.यु.आय. चे विद्यार्थी निवडून आला. सिंदेवाहीत युवक काँग्रेसचे गुरनुले युवक काँग्रेसचे योगेश गुरनुले यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अमित चंद्रगिरीवार यांचा आठ-पाचच्या मताने पराभव करून युवक काँग्रेस झेंडा रोवला. यासाठी ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हार्दिक सुचक यांनी प्रतिष्ठेची केली होती. विजयी झाल्यानंतर युवक काँग्रेसने सर्वोदय महाविद्यालयासमोर रॅली काढली. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश बोरकुंडवार, युवक नेते मयुर सुचक, आशिष निकोडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. बल्लारपूर - गुरूनानक विज्ञान महाविद्यालयात वसंत चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात दिलीप परचाके, कला वाणिज्य महिला महाविद्यालयात आरती भिमटे, मोहसिन भाई जव्हेरी कन्या महाविद्यालय सरिता यादव हे विद्यापिठ प्रतिनिधी म्हणून निवडणून आले. चंद्रपुरात जनता महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कुंदन घुले, खत्री महाविद्यालयात महेश घोटे, महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अनिता छेदीलाल यादव निवडून आलेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राजुऱ्यात शिवाजी महाविद्यालयात नरेंद्र धोबे, नवरगावात प्रणव परशुराम उईके, सावलीत राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात अमित वाढई, गोंडपिपरीत गजानन महाराज महाविद्यालयात सूरज माडूरवार, चिंतामणी महाविद्यालयात शरदकुमार ढोके, कला व वाणिज्य महाविद्यालयात अमोल पाल, भंगाराम तळोधीतील अनिल आर्इंचवार कला, वाणिज्य महाविद्यालयात सुनिल बुरीवार विजयी झाले. भद्रावतीत निळकंठराव शिंदे महाविद्यालयात एनएसयूआयचा विलास दुर्योधन तर विवेकानंद महाविद्यालयात भाजपाप्रणित विद्यार्थी परिषदेची आश्विनी डाखरे अविरोध आली. (शहर प्रतिनिधी)