ग्राम पंचायत ची निवडणूक रेती तस्करांना ठरली पर्वणी
फोटो : पोलीस ठाण्यासमोरील रेती वाहतुकी वर नजर ठेवण्या करिता लावलेले सिसिटीव्ही कामेरे
घुग्घुस : जिल्हयात ग्राम पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अधिसूचना जाहीर झाल्यापासून महसूल विभाग निवडणुकीत व्यस्त होण्याचे दाखवून रेती तस्करी कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकां कडून होत आहे.सीसीटीव्ही कामेरे ,नदीकाठावर खड्डे बनवून रेती तस्करी वर आळा घालण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न रेती तस्करांनी हाणून पाडला.
घुग्घुस वर्धा नदी परिसरातील रेती घाटाचा लिलाव मागील दोन वर्षापासून लिलाव झाला नसल्याने मोट्या प्रमाणात रेती चोरी होत आहे हे सर्वश्रुत आहे.दरम्यान महसूल विभागाने ,पोलीस विभाग व खनिकर्म विभागाच्या वतीने रेती तस्करावर आपापल्या परी कारवाया करून दंड वसूल केला.काही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून लागलेले आहे.मध्यतरी रेती तस्करी चे चांगलेच प्रकरण गाजले जिल्हा प्रशासनाने रेती तस्करी थांबविण्यासाठी समिती नेमली.त्यासमितीचा यापरिसरात कधी पत्ता लागला नाही दरम्यान तहसीलदार यांनी नदी घाटा वर जाणाऱ्या रस्त्यावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी खोलवर जेसीपी च्या सहाय्याने खड्डे खोदले. तर तहसीलदारांनी पोलीस ठाण्या समोर दोन सीसीटीव्ही कामेरे लावले.त्या सिसिटीव्ही चे कनेक्शन सरळ तहसीलदार साहेबांच्या कक्षेत असल्याचे स्थानिक महसूल विभागाच्या आधिकाऱ्या कडून समजते.तस्करांनी नदी घाटावरील खड्डे बुजविल्याची चर्चा आहे. तर दरम्यान तस्करांनी दुसऱ्या रस्त्याचे निर्माण करून अधिक रेती उत्खनन सुरू केले.पोलीस ठाण्या समोरून आजही रात्र दिवस रेती तस्करी खुल्लेआम बिनारोखठोक सुरू आहे.त्यामुळे सिसिटीव्ही कामेरे शोभेची वस्तू ठरली आहे. नदी घाटावरील खड्डे बुझविले मात्र येथील तलाठी व मंडळ अधिकारी अनभिज्ञ आहे.या संदर्भात तलाठी यांचे शी संपर्क साधला असता ऐकले पण निवडणूकीच्या कामा व्यस्त आहे त्यामुळे तिकडे लक्ष नसल्याचे सांगितले.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
रेेती तस्करी दिवसरात्र मोट्याप्रमाणावर पोलीस
ठाण्यासमोरून सुरू आहे.रात्री रेती वाहतूक करता येत नाही .पोलिसांची रात्रकालीन गस्त सुरू असते मात्र रेती वाहतूक होत असताना एकही ट्रॅक्टर ,हायवा ट्रक कधी दिसून येत नाही का ?
यापूर्वी पोलिसांनी रेती घाटा वरून ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. त्यामुळे पोलिसांच्या पेट्रोलिंग वर व पोलीस ठाण्याच्या समोरून होत असलेल्या रेती वाहतूक कशी होते हे मात्र घुग्घुस वाशिया साठी चर्चेचा विषय बनला आहे.
घुग्घुस गावात येणाऱ्या शासकिय वाहनावर नजर ठेवण्यासाठी रेती तस्कराची पेट्रोलिंग. दिवस व रात्री रेती उत्खनन तस्करी करणारे ट्रॅक्टर मालकाची मोठी फिल्डिंग लावून कारवाई पासून बचाव व अधिक रेती तस्करी करता येईल यासाठी घावपळ करण्यात व्यस्त असते.