शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

निवडणुकीस पात्र  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप यादीवर काहींनी आक्षेप दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. परिणामी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने आपले यापूर्वीचे दोन्ही आदेशही रद्द केले. जिल्ह्यात नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. प्राधिकरणाने निर्णय रद्द केल्याने या निवडणुका आता लांबणीवर गेल्या.

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतल्याने निवडणूक मुहूर्त आता मार्च २०२२ पर्यंत लांबणीवर गेला आहे. जिल्ह्यात आजमितीस नऊ  बाजार समित्यांची मुदत संपली. मार्च २०२२ पर्यंत पुन्हा तीन अशा एकूण १२ बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकताच २२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यातील सर्व बाजार समित्याच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. निवडणुका घेण्याबाबत प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश काढले होते. मात्र, निवडणुकीस पात्र  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप यादीवर काहींनी आक्षेप दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. परिणामी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने आपले यापूर्वीचे दोन्ही आदेशही रद्द केले. जिल्ह्यात नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. प्राधिकरणाने निर्णय रद्द केल्याने या निवडणुका आता लांबणीवर गेल्या.   नवीन आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जारी करतील.

कोरोना प्रादुर्भावामुळे तीनदा मिळाली होती निवडणुकीला मुदतवाढकोरोनामुळे यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना यापूर्वी ३० जून व ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा निवडणुका स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था यामधून वगळण्यात आल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात ३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.  कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुका आता लांबणीवर गेल्या. याबाबत आजच व्हीसी झाली. मार्च २०२२ पर्यंत या निवडणुका होऊ शकतात. सध्या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कटाक्षाने अंमलबजावणी सुरू आहे. - प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर

३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांऐवजी चंद्रपूर जिल्ह्यातील आधी ३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला. उर्वरित ३१७ सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक