शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; घडामोडींना वेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:28 IST

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, त्यानुसार राजकीय हालचाली वेगाने होत आहेत.

ठळक मुद्देभाजपचे नगरसेवक, जि.प. सदस्य महाबळेश्वरला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, त्यानुसार राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. अशातच मतदारांची पळवापळवी होण्याची भीती लक्षात घेऊन भाजपने नगरससेवक, जि.प. सदस्यांना अज्ञातस्थळी सहलीला नेले आहे. मात्र हे अज्ञात स्थळ लपून राहिले नसून महाबळेश्वर असल्याचे समजते.या मतदार संघात रामदास आंबटकर(भाजप), इंद्रकुमार सराफ(काँग्रेस), सौरभ तिमांडे (अपक्ष) व जगदीश टावरी (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहे. मात्र जगदीश टावरी यांनी भाजप उमेदवाराला पाठींबा दर्शविल्यामुळे उर्वरित तीन उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. अपक्ष उमेदवार सौरभ तिमांडे यांचे वडील माजी आमदार राजू तिमांडे हे काँग्रेस उमेदवार हे भाजपशी साठगाठ करून असल्याचा आरोप करीत सुटले आहे. तर राजू तिमांडे यांनी भाजपच्या प्रलोभनावर ही उमेदवारी कायम ठेवून आघाडीला छेद दिल्याचा सूर काँग्रेस गोटातून उमटत आहे. यावरून काँग्रेस आणि अपक्षातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.भाजपकडे नगरसेवक, जि.प. सदस्य, पंचायत समिती सभापतींचा आकडा मोठा आहे. मात्र भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार असतानाही नगरसेवकांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता भाजपची चिंता वाढवत असल्याचे बोलले जात आहे. अशात गफलत होण्याची भीती लक्षात घेऊन भाजपने आपले नगरसेवक, जि.प.सदस्य व पंचायत समिती सभापतींना अज्ञातस्थळी हलविले आहेत. मात्र हे अज्ञातस्थळ लपून राहिले नाही. या सर्वांना महाबळेश्वरला रवाना केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो. मात्र या निवडणुकीत असे काहीही होणार नसल्याच्या चर्चेनेही मतदार अस्वस्थ झाले असल्याचे समजते. एकंदर घडामोडींवरून विद्यमान स्थितीत भाजपची बाजू मजबूत मानली जात असली तरी मतदारांमध्ये असलेली अस्वस्थता कुणाच्या पथ्यावर पडते हे बघण्यासारखे आहे.

टॅग्स :BJPभाजपा