शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे!

By admin | Updated: January 12, 2017 00:40 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.

हंसराज अहीर यांचे निर्देश : कृषी विकास आढावा बैठक, कामांचे अहवाल सादरचंद्रपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाकाक्षी योजनांची अंमलबजावणी करून भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे लक्ष्य कालबद्ध वेळेत पूर्ण करून या योजनांचा लाभ तालुकानिहाय अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवितानाच सिंचन व अन्य योजनांना रचनात्मक स्वरूप देवून शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता या योजा प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी कृषी विभागाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.सदर आढावा बैठकीस कृषी विभागाचे उपसंचालक घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनावदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी देशमुख, जि.प.चे कार्यकारी अभियंता (सिंचाई) सहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस भाजपाचे जेष्ठ नेते विजय राऊत, जिल्हा सचिव राहुल सराफ, तुळशीराम श्रीराम, नरेंद्र जीवतोडे, राजू घरोटे, राजू येले, महेश देवकाते, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, शेख जुम्मन रिझवी उपस्थित होते.सदर आढावा बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजना, केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मागेल त्याला शेततळे, बोडी, जिल्ह्यातील डब्ल्यू १६ मेगा पाणलोट व डब्ल्यूजीएएम २ मेगा पाणलोट, मृदा संधारण, कुकूटपालन, मधुमक्षिकापालन, सौर दिवे, सौर पथदिवे, कृषी साहित्य, प्रेरक प्रवेश उपक्रम आदी योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकास कामाची माहिती आकडेवारीनुसार सादर करण्यात आली.यावेळी खरीप व रब्बी हंगामानंतर उपलब्ध खत साठ्याचा आढावा, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतानाच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ सर्वव्यापी होण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. लक्षांकापेक्षा जास्त आलेल्या अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामध्ये सुकरता येण्याकरिता व या योजनेचा लाभ परिवारातील सदस्यांना मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ना. अहीर यांनी दिल्या. (नगर प्रतिनिधी)