शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाच्या प्रतीक्षेत शिक्षणाधिकारी तासभर बसले शाळेच्या पायरीवर

By admin | Updated: May 23, 2014 23:46 IST

आरटीइ अ‍ॅक्ट-२००९ च्या तरतुदींचे कसलेही पालन न केल्याने आधीच अपात्रतेच्या यादीत आलेल्या चंद्रपुरातील एस.डी. म्हस्के हायस्कूलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या शिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाला

चंद्रपूर : आरटीइ अ‍ॅक्ट-२००९ च्या तरतुदींचे कसलेही पालन न केल्याने आधीच अपात्रतेच्या यादीत आलेल्या चंद्रपुरातील एस.डी. म्हस्के हायस्कूलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या शिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाला आज शुक्रवारी धक्कादायक अनुभव आला. आदल्या दिवशी सूचना देवूनही कुणीही शाळेत उपस्थित नव्हते. मुख्याध्यापकांनी मोबाईल स्विच आॅफ करून ठेवला होता, तर आता पोहोचतोच आहे, असे सांगत काही वेळाने शाळेच्या सचिवांनीही मोबाईल स्विच आॅफ केला. अखेर कुलूपबंद शाळेच्या पायरीवर तासभर प्रतीक्षा करुनही शिक्षणाधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पथकाला बाहेरून आढावा घेवूनच परतावे लागले. चंद्रपुरातील एस.डी. म्हस्के हायस्कूलमध्ये आरटीइ अ‍ॅक्टनुसार तरतुदींचे पालन होत नसल्याचे ६ मार्चच्या पहाणीत आढळून आले होते. त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविल्यावर शाळेचे मुध्याध्यापक आणि संस्था सचिवांची सुनावणी झाली होती. संस्थासचिवांनी मुख्याध्यापकाकडून नियमबाह्य रक्कम कपात करणे, शाळा संहिता नियम ३.२ नुसार पूर्तता न करणे, आरटीइ अ‍ॅक्टनुसार कार्यवाही न करणे, संस्थेने विश्वासार्हता गमावणे, शिक्षणाधिकार्‍यांकडून मान्यता रद्द करण्यासाठी शिफारस येणे आदी मुद्यांंवर चर्चा झाली होती. या सुनावणीनंतर शिक्षण उपसंचालकांच्या १२ मे च्या पत्रावरून आज शुक्रवारी हे पथक अंतीम पहाणीसाठी शाळेत आले होते. त्यात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देशपांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक गुढे) आणि अन्य सदस्यांचा समावेश होता. सकाळी ८ वाजता हे पथक येणार असल्याची सूचनाही आदल्या दिवशी मुख्याध्यापक आणि संस्थासचिवांना दिली होती. मात्र त्याकडे साफ पाठ फिरवून या दोघांनीही शाळेत येण्याचे टाळले. पथक पोहोचले तेव्हा केवळ शाळेतील एक शिपाई हजर होता. मात्र त्याच्याकडे शाळेच्या किल्ल्या नव्हत्या. शाळेतील लिपिकापासून तर मुख्याध्यापक, संस्थासचिव या सर्वांना मोबाईलवरून संपर्क साधून झाला. पण कुणीही फिकले नाही. सुरूवातीला संस्थासचिवांचा मोबाईल सुरू होता. मात्र नंतर तोसुद्धा स्विच आॅफ झाला. अखेर दिड तास वाट पाहून या पथकाने शाळेच्या पायरीपर बसूनच आपला अभिप्रय तयार केला. त्यात शाळेतील पहाणीत आढळलेल्या त्रुट्यांचा उल्लेख करुन शाळा मान्यता काढण्याचा अभिप्राय नमुद करुन हे पथक परतले. (जिल्हा प्रतिनिधी)