शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

भूकंपाचा नव्हे, भूस्खलनाचा धोका

By admin | Updated: April 29, 2015 01:02 IST

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने चंद्रपुरातील इमारती हादरल्या खऱ्या, मात्र प्रत्यक्षात चंद्रपूरला भूकंपाचा नव्हे तर भूस्खलनाचा धोका अधिक आहे.

संतोष कुंडकर  चंद्रपूरनेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने चंद्रपुरातील इमारती हादरल्या खऱ्या, मात्र प्रत्यक्षात चंद्रपूरला भूकंपाचा नव्हे तर भूस्खलनाचा धोका अधिक आहे. कोळसा खाणींनी वेढलेल्या चंद्रपूर शहराच्या चहुबाजूने वेकोलिने जमिन पोखरून ठेवली. मात्र नियमानुसार त्यात रेती भरण्यातच आली नाही आणि अजुनही ती भरल्या जात नसल्याने चंद्रपूर शहरावर भूस्खलनाचे संकट घोंगावत आहे. याविषयात पर्यावरणवाद्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याची आजवर दखलच घेण्यात आली नाही. याविषयात वेकोलिकडून केवळ कागदोपत्री रेती भरण्याची अंमलबजावणी करण्यात येऊन संबंधित अधिकारी लाखो रुपयांचा निधी परस्पर गिळंकृत करीत असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. शनिवारी नेपाळमध्ये भूकंप झाला. तो इतका भीषण होता की, त्याचे दुष्परिणाम चंद्रपूर शहरापर्यंत जाणवले. शहरातील अनेक इमारती हलल्या. त्यामुळे नागरिक भयभित झालेत. असे असले तरी प्रत्यक्षात चंद्रपूर शहर किंवा जिल्ह्यात भूकंप केंद्र कुठेच नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर अथवा जिल्ह्याला भूकंपाचा धोका नसला तरी कोळसा खाण क्षेत्रात मात्र भूस्खलनाची शक्यता अधिक आहे. अशा घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. वणी (जि.यवतमाळ) तालुक्यात बोरगाव येथे २००९ मध्ये भूस्खलनाची मोठी घटना घडली होती.१ १२ भूमिगत खाणीचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३६ खाणी असून त्यांपैकी १२ भूमिगत कोळसा खाणी आहेत. त्यांपैकी दुर्गापूर कोळसा खाण, डीआरसी खाण, बल्लारपूर येथील भूमिगत कोळसा खाण अशा भूमिगत खाणी आहेत. या १२ कोळसा खाणीतून आजवर करोडो रुपये किंमतीच्या कोळशाचे उत्खनन करण्यात आले. मात्र नियमानुसार त्यात रेती भरण्यात आली नसल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. ४ नोटीस देऊन प्रशासन मोकळेवेकोलिने उभ्या केलेले मातीचे धोकादायक ढिगारे हटविण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील पर्यावरणवादी संघटना शासनाशी संघर्ष करीत आहेत. अलिकडे मागणी लक्षात घेऊन ढिगारे उचलण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला नोटीस बजावली खरी; परंतु नोटीसचे पुढे काय झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे.