शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Chandrapur; ई पास नावालाच; कोणीही यावे, सीमेत शिरून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 10:06 IST

Chandrapur news कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सीमाबंदी करण्याचा निर्णय घेतला. ई पास असेल तरच जिल्हा ओलांडून जाण्याचे आदेश दिले. मात्र, पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याने कुणीही यावे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सीमेत शिरून परत जावे, असे चित्र सोमवारी रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले.

ठळक मुद्देपोलीस यंत्रणा तोकडीई पास नसल्याने काही सीमेवर प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सीमाबंदी करण्याचा निर्णय घेतला. ई पास असेल तरच जिल्हा ओलांडून जाण्याचे आदेश दिले. मात्र, पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याने कुणीही यावे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सीमेत शिरून परत जावे, असे चित्र सोमवारी रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले.

राज्य सरकारने राज्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जाते. त्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर २२ एप्रिल रात्री८ वाजतापासून १ मेपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले. बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त आवश्यक कामासाठी खासगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतो. आदेशात नमूद केल्याप्रमाणे गृह विलगीकरणातही राहावे लागणार आहे. परंतु, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, तेलंगणा सीमेवार आज उलट चित्र दिसून आले. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने अन्य जिल्ह्यातून वाहनाद्वारे नागरिकांची ये-जा सुरू होती.

विनाकारण फिरण्यात तरूणाई पुढे

आंतरजिल्हा प्रवासासाठी वैद्यकीय व अत्यावश्यक कारणांसाठीच इ पास दिला जातो. मात्र, आज चार सीमांना भेट देऊन पाहणी केली असता विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी दिसून आली. यामध्ये युवक संख्येने अधिक दिसून आले. पोलिसांच्या दुर्लक्षाचा युवक गैरफायदा घेत आहेत.

ई पास कसा काढावा हेही माहिती नाही?

पोलीस प्रशासनाने ई-पास काढण्यासाठी संकेतस्थळ जाहीर केले. त्यासाठी कोणतेही कागदपत्रे लागतात, याचीही माहिती दिली. पण, ही माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नाही. यासाठी प्रशासनाने प्रयत्न न केल्याने ई- पास लागतो, माहितीच मिळाली नसल्याचा आरोप काही वाहनधारकांनी केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस