शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीतील धुळप्रदूषणाने गुदमरतोय कामगारांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 11:29 IST

Dust pollution Chandrapur News राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देराजुरा तालुक्यात कोळसा खाणींमुळे प्रदूषण वाढलेकामगारांचे आरोग्य धोक्यात

नितीन मुसळे/प्रकाश काळे

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर  : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमच्या कोळसा खाणीत अजिबात धुळप्रदूषण होत नाही, असा उरफाटा जावईशोध वेकोलि अधिकाऱ्यांनी लावल्याने आता वेकोलि अधिकाऱ्यांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा भूलथापा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी -०२, गोवरी डीप या वेकोलिच्या कोळसा खाणीत वेकोलिकडून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत आहे. वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. केवळ थातुरमातूर पाणी मारण्याचे काम केले जात आहे. कोळसा खाणीत धूळ प्रदूषण होऊन कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी वेकोलिने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत गोवरी डीप कोळसा खाणींचे मॅनेजर प्रसाद यांना विचारणा केली असता, आमच्या कोळसा खाणीत अजिबात धुळ प्रदूषण होत नाही असा दावा त्यांनी केला आहे. केवळ फलक लावून कोळसा खाणीत अजिबात धुळ नसल्याचा गाजावाजा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात वरिष्ठांनी कोळसा खाणींची पाहणी केली तर कोळसा खाणीतील सत्य बाहेर येईल.

पर्यावरण विभागाचा देखावाच

कोणत्याही कोळसा खाणीत पर्यावरणाला धोका पोहचणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी वेकोलित पर्यावरणाचा समतोल साधता यावा. धुळ प्रदूषण करू नये. असे मोठे फलक रस्त्यालगत दिमाखात उभे आहे. परंतु पर्यावरणाच्या नियमांची वेकोली प्रशासनाकडून पायमल्ली करण्यात येत असल्याने. पर्यावरण फलक केवळ देखावा म्हणून उभे आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण