शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मिरवणुकीत ट्रॅक्टर सुरू ठेवून चालक गेला नाचायला अन् घात झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 20:18 IST

Chandrapur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोथली येथे निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टर सुरू करून चालक नाचायला गेला. यात ट्रॅक्टर अचानक समोर गेल्याने चारजण जखमी झाले.

ठळक मुद्देट्रॅक्टर पुढे गेल्याने चारजण जखमी

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोथली येथे निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टर सुरू करून चालक नाचायला गेला. यात ट्रॅक्टर अचानक समोर गेल्याने चारजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बोथली येथे घडली.

कोरोना प्रतिबंधामुळे दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत नव्हता. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय उत्साहात प्रत्येक गावात मिरवणूक काढण्यात आली. सावली तालुक्यातील बोथली येथे उत्साहात काढलेल्या मिरवणुकीत हा अनपेक्षित अपघात घडला.

बाबासाहेबांचा रथ असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकालाही मिरवणुकीत नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने ट्रॅक्टर बंद न करता ताे चालूच ठेवून नाचण्यासाठी खाली उतरला. दरम्यान, ट्रॅक्टर पुढे असणाऱ्या लोकांच्या अंगावर गेल्याने त्यात चारजण जखमी झाले. प्रतीक भारत दुर्गे (वय २२), उषा उमाजी कोसनकर (४५), योगिता सागर खोब्रागडे (३१, सर्व रा. बोथली) व शालिनी दुर्योधन कुमरे (३५, रा. हिरापूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार रामकृष्ण बोधे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात