शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

लोकसभेच्या तयारीत मग्न सेनेचे धानोरकर युतीमुळे अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:54 IST

आरोप-प्रत्यारोपाचे शस्त्र बासणात गुंडाळून भाजप-शिवसेनेने निवडणुकीसाठी एकमेकांच्या गळ्यात हात टाकल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्ष आदेशानुसार निवडणुकीसाठी सज्ज झालेले शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा मात्र हिरमोड झाल्याचे समजते.

ठळक मुद्देयुतीतील बिघाड काँग्रेसच्या पथ्यावर : नव्या समीकरणाचे संकेत

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोप-प्रत्यारोपाचे शस्त्र बासणात गुंडाळून भाजप-शिवसेनेने निवडणुकीसाठी एकमेकांच्या गळ्यात हात टाकल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्ष आदेशानुसार निवडणुकीसाठी सज्ज झालेले शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा मात्र हिरमोड झाल्याचे समजते. लोकसभेची मानसिकता तयार केल्यानंतर आता यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी त्रासदायक होत असल्याची माहिती आहे.सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा काँग्रेसमध्येही व्हायला लागली होती. हे उल्लेखनीय. काँग्रेसचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. युतीनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये आमदार धानोरकर यांच्या हालचाली महत्त्वाच्या ठरणार असून या घडामोडी काँग्रेसच्या पथ्यावर पडणाऱ्या असतील, असेही बोलले जात आहे.लोकसभेची चर्चा सुरू झाल्यापासूनच शिवसेना आमदार धानोरकर यांचे नाव काँग्रेसकडून उमेदवारीसाठी घेतले जात होते. काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यासाठी आग्रही होते, असाही सूर होता. आ. वडेट्टीवार हे पूर्वी शिवसेनेत होते. आ. धानोरकर यांनी शिवसेनेचा धनुष्य खाली ठेवून काँग्रेसचा हात धरावा, अशी त्यांची सुप्तइच्छा असल्याचेही बोलले जात होते. मात्र आमदार धानोरकर यांनी याबाबत कुठेही जाहीर वाच्यता केली नाही. दरम्यान, राज्य पातळीवर भाजप-सेनेचे वाद विकोपाला जात होते. यातच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवताना ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. शिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात उमेदवार उभा करण्याची तयारीही शिवसेनेने सुरू केली होती. याला चंद्रपूर लोकसभा मतदार संघही अपवाद नव्हता. या मतदार संघात शिवसेनेने आ. बाळू धानोरकर यांना तयारीला लावले होते. यामुळे आ. धानोरकरांच्या नावाची काँग्रेसकडून सुरू असलेली चर्चा एकाएकी थांबली. धानोरकरांनीही मानसिकता तयार करून लोकसभा मतदार संघातील कार्यक्रमांना हजेरी लावणे सुरू केले होते. अशातच त्यांनी भाजपवर टीकाही करायला सुरूवात केली होती. हे सारेकाही सुरू असताना शिवसेना पक्ष प्रमुखांनी भाजपसोबत युती केली. यामुळे भाजपच्या ताब्यातील लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची मोठी अडचण झाली. युतीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदार संघ हा भाजपच्याच वाट्याला असेल. हे तेवढेच सत्य आहे. आधी टीका करायची, आता मांडीला मांडी लावून बसावे लागणार. शिवसेनेत निर्माण झालेली ही अस्वस्थता काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी आहे. ही नामी संधी काँग्रेस ‘कॅश’ करते वा नाही हे बघण्यासारखे आहे.युतीमुळे संजय देवतळेंचे गणित बिघडले२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत, नंतर विधानसभा निवडणुकीत वरोरा-भद्रावती मतदार संघात भाजपच्या तिकीटावर लढून अपयशी ठरलेले संजय देवतळे यांचे राजकीय गणित भाजप-शिवसेना युतीने चांगलेच बिघडले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढली होती. संजय देवतळे हे भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेचे बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती झाली आहे. हा मतदार संघ पूर्वीपासूनच शिवसेनेकडे आहे. पुढेही तो राहतील. यामुळे संजय देवतळे यांची अस्वस्थता चांगलीच वाढली आहे. राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्यासाठी ते पुन्हा काँग्रेसचा हात धरू शकतात, अशीही चर्चा ऐकायला येत आहे.काँग्रेसच्या उमेदवारावर भाजपचे गणितकाँग्रेसने आपला उमेदवार गुलदस्त्यात ठेवल्यामुळे भाजपचीही मोठी अडचण झाली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या प्रत्येक चेहºयासोबत नवे समीकरण जुळलेले आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपही आपले नवे डावपेच आखण्याच्या बेतात आहे. मात्र काँग्रेसने उमेदवारच जाहीर न केल्यामुळे भाजपला रणनिती आखताना अडचण येत असल्याची माहिती आहे.काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातचचंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी गतीने सुरू केली असली तरी काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहे. उमेदवाराची घोषणा केव्हा होईल. त्यानंतर संभाव्य उमेदवाराला प्रचाराला किती काळ मिळेल, याबाबत काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहे.