शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या कॅॅमेऱ्यांना बिबट्याची हुलकावणी

By admin | Updated: November 22, 2014 00:24 IST

येथून जवळच असलेल्या आणि बफर झोनमध्ये येत असलेल्या वायगावमध्ये बिबट्याची दहशत काही केल्या कमी झाली नाही.

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या आणि बफर झोनमध्ये येत असलेल्या वायगावमध्ये बिबट्याची दहशत काही केल्या कमी झाली नाही. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाने ठिकठिकणी कॅमेरे लावले आहे. मात्र या कॅमेऱ्याची नजर चुकवून बिबट्या गावात प्रवेश करीत आहे. मागील दोन दिवसांमध्ये बिबट्याने कुत्रे आणि कोंबड्यावर ताव मारला आहे. एवढेच नाही तर, गुरांच्या गोठ्यात बिबट घुसला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातून त्याला हुसकावण्यात यश आले आहे. दोन दिवसापूर्वी एका वासराचा बळी घेतल्यानंतर गावात दहशत आहे. वनविभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे. मात्र त्या तुटपुंज्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आदिवासीबहुल गाव म्हणून ओळख असलेल्या वायगावमध्ये बहुतांश नागरिकांकडे शेती आहे. शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना शेतात जाणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांकडे मोठ्या संख्येने जनावरे तसेच कोंबड्या, कुत्रे आहे. मागील काही दिवसांपासून गाव परिसरात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ सुरु केला आहे.बिबट्याच्या दहशतीनंतर वनविभागाने काही ठिकाणी कॅमेरे लावले आहे. मात्र या कॅमेऱ्याचा कुठेच फायदा होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावात वनविभागाने गस्त सुरु केली. मात्र १० वाजेपर्यंत वनकर्मचारी येथे राहत नसल्याचे समजते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नजरेत बिबट्या येत नाही. गावात काही ठिकाणी सौर दिवे लावण्यात आले आहे. मात्र ते झाडांच्या खाली लावण्यात आले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश पडत नसल्याने त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही. केवळ एक ते दोन तास प्रकाश पडल्यानंतर ते दिवेही बंद पडत आहे.विशेष म्हणजे, गावात शौचालयाची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे किमान वनविभागाने ग्रामस्थांना शौचालयाचे बांधकाम करून दिल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकते.वायगाव येथील माजी सरपंच विलास तोडासे म्हणाले, गाव परिसरात जंगल आहे. त्यामुळे नेहमी वन्यप्राण्यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास काही प्रमाणात हा त्रास सुटू शकतो. वनविभागाने गावात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंरजे लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या शेती हंगाम असतानाही वाघाच्या दहशतीमुळे अनेकांनी शेतात जाणे बंद केले आहे. दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहे. आता तर, बिबट्याने गावात प्रवेश करणे सुरु केला आहे. मात्र वनविभागाने पाहिजे तशा उपाययोजना अद्यापही केल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.सौरदिवे कुचकामीगावातील काही रस्त्यांवर सौरदिवे लावण्यात आले आहे. मात्र सदर दिवे कुचकामी ठरत आहे. काही दिवे अगदी झाडाच्या खाली लावण्यात आल्याने त्यावर सूर्यप्रकाश पडत नाही परिणामी ते बंदच असते. तर काही दिवे रात्री १० ते ११ वाजेपर्यंत चालल्यानंतर तेही बंद पडते. त्यामुळे जेव्हा प्रकाशाची गरज असते तेव्हाच सौरदिवे बंद असल्याचे चित्र सध्या गावात आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावात येत असले तरी नागरिकांना तसेच वनकर्मचाऱ्यांनाही दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)