शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:08 IST

यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही.

ठळक मुद्दे३५ टक्केच पाऊस : सिंचन प्रकल्पात निम्म्याहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी असताना आतापर्यंत केवळ सरासरी ४०२.४८९ मिमी पाऊसच पडला. परिणामी जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच जिल्ह्यात यंदा भीषण कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगाऊ लागले आहे.वेळशाळेच्या अंदाजाला यंदा पावसाने चांगलीच चपराक दिली. जुलै हा पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. चार दिवसांचा अपवाद वगळला तर हा संपूर्ण महिना कोरडा गेला. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३६.४०६ मिमी आहे. मागील वर्षी सरासरी ओलांडून म्हणजेच १३९५.७१३ मिमी पाऊस बरसला.मात्र यावर्षी वरूणराजाने जिल्ह्याला वाकुल्या दाखविल्या. जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९६.५६ मिमी पाऊस पडला. आज ३ आॅगस्ट रोजी सरासरी ४०२.४८९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच केवळ ३० ते ३५ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी असतो. या दोन महिन्यात पावसाची ७० टक्के उणीव कशी भरून निघेल, हा प्रश्नच आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाले, बोड्या, तलाव यातील जलसाठाही चिंताजनक आहे. १० ते २० टक्के धान उत्पादक शेतकºयांचे अद्याप रोवणे शिल्लक आहे. उर्वरित शेतकºयांचे रोवणे झाले. मात्र आता पिकांना पाणी हवे आहे. पाऊस पडला नाही, तर शेतकºयांचे यंदा अतोनात नुकसान होणार आहे.चंद्रपूरकरांवरही पाण्याचे संकटचंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्य:स्थितीत इरई धरणात केवळ ३६.६३ टक्केच पाणी आहे. या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात या धरणात पाणी जमा झाले नाही, तर पुढे चंद्रपूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढवू शकते.सिंचन प्रकल्पांची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील आसोलामेंढा प्रकल्पात ६३.११ टक्के जलसाठा आहे. हा अपवाद सोडला तर उर्वरित दहाही सिंचन प्रकल्पांची स्थिती जुलै महिन्यातच चिंताजनक आहे. घोडाझरी प्रकल्प ३१.७५ टक्के, नलेश्वर-३४.८३, चंदई-३८.९७, चारगाव-३५.२३, अमलनाला-१७.५८, लभानसराड-०.०३, पकडीगुड्डम-१०.९३, डोंगरगाव-४२.४७, इरई-३६.६३ आणि लालनाला प्रकल्पात १९.७८ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पात ७० ते ७२ टक्के जलसाठा होता.