शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:19 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.जुलै-आॅगष्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशातच कसेबसे पीक सावरले. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा व ओलित शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन वेचे शिल्लक असताना पडलेल्या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेचा किरण हिरावला आहे. अकाली पावसामुळे काही शेतकऱ्यांचा झाडावरचा कापूस जमीनदोस्त झाला तर काही कापूस ओला झाल्याने कापसाला भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी, बल्लारपूर यासह काही तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना अकाली पावसाचा फटका बसला असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे.काही शेतकºयांनी चालू हंगामात हरभरा पेरला असताना पिके उगवायला लागली होती. दरम्यान काही शेतकºयांचे हरभरा पीक फुलावर आले होते. अकाली पावसामुळे आलेला बहर गळाल्याच्याही घटना घडल्या आहे.नेहमी अस्मानी किंवा सुलतानी संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अवकाळी पावसाने घाला घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गुलाबी बोंडअळीचाही प्रकोपकोरपना तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळीचाही प्रकोप दिसून येत आहे. कापसाच्या ऐन शेवटच्या हंगामात बोंडअळी आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील खिर्डी येथील धनराज मालेकर या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस पिकावर बोंडअळी आल्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील अनेक तालुके शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले असून सर्वेक्षणामध्ये चुका झालेल्या आहेत. अशातच अकाली पावसाने घाला घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित सर्वेक्षण करू नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी.- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुराआमच्याकडे कापूस व हरभरा दोन्ही पीक असून अकाली पावसामुळे दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. झाडावरचा कापूस ओला झाला असून काही कापूस गळून पडला आहे तर हरभरा पिकाचा बहरसुद्धा खाली गळून पडला आहे.- जैराम ढेंगळे, शेतकरी