शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक कर्ज न दिल्याने खासदार निधीचे खाते केले वळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:42 IST

ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांमधून शासकीय जमा खाते काढून पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहे, अशा बँकेमध्ये ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देना. अहीर यांचा पीएनबीला दणका शासकीय व निमशासकीय यंत्रणेलाही दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांमधून शासकीय, निमशासकीय यंत्रणेचे शासकीय जमा खाते काढून ज्या बँका पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहे, अशा बँकेमध्ये ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिले आहेत. याची सुरूवात त्यांनी स्वत:पासून केली आहे. ना. अहीर यांनी त्यांचे खासदार निधीचे खाते हे पंजाब नॅशनल बँकेतून काढून बँक आॅफ इंडियामध्ये स्थलांतरीत करण्याचे निर्देश दिले.बँक अधिकारी पीक कर्ज वाटप, मुद्रा लोन व इतर व्यावसायिक लोन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी व लाभार्थ्यांशी अधिकारी उद्धटपणे वागतात, अशा तक्रारी ना. अहीर यांच्याकडे यांना प्राप्त झाल्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी ज्या बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.पंजाब नॅशनल बँकेची पीक कर्जाच्या संदर्भात कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. पीएनबी बँकेने सन २००१५-१६ मध्ये ८ टक्के, २०१६-१७ मध्ये ७.०८, २०१७-१८ मध्ये ६.९३, तर २०१८-१९ मध्ये ७ जूनपर्यंत शून्य टक्के पीक कर्ज वाटप केले. यामुळे संतप्त झालेल्या ना. अहीर यांनी खासदार निधीचे खाते काढून बँक आॅफ इंडियात स्थानांतरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बँक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून पीक कर्ज, मुद्रा लोन यामध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या बँकेतील सरकारी खाते स्थानांतरीत करण्याची प्रक्रीया प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर