शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 05:00 IST

तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दोन दिवस सातत्याने पाणी वाढत असल्याने सलग तीन चार दिवस घरांमध्ये पाणी साचून राहिले. यामुळे घरांचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे४६७१ घरांची अंशत: पडझड : ३२ झोपड्याही वाहून गेल्या, महसूल विभागाचे पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : वैनगंगेच्या महापुराने तालुक्यातील सुमारे पाच हजार ३०२ घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये ४९० घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत तर ४६७१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. जनावरांचे १०९ गोठे वाहून गेले असून ३२ झोपडयासुद्धा महापुराने वाहून गेल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील पडझडीचे आकडे आता उपलब्ध होऊ लागली आहेत.तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दोन दिवस सातत्याने पाणी वाढत असल्याने सलग तीन चार दिवस घरांमध्ये पाणी साचून राहिले. यामुळे घरांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीला प्रशासन त्वरित धावून आले. त्यामुळे जीवित हानी टळली असली तरी शेतीचे आणि घरांचे नुकसान टळू शकले नाही.पुराचे पाणी उतरताच तालुका प्रशासनाने पंचनाम्यास सुरुवात केली आहे. महसूल विभाग व पंचायत विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान एकूण चार हजार ७०० लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून उरलेल्या ४०० लोकांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये त्वरित जमा करण्यात येणार आहे. पुरामध्ये संपूर्ण घर पडलेल्या लोकांना ९५ हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.महापुराचा व्यवसायिक व शिक्षणक्षेत्रालाही तडाखावैनगंगेच्या महापुराचा तालुक्यातील व्यावसायिक व शिक्षण क्षेत्रालासुद्धा फटका बसला असून व्यावसायिक व शिक्षण क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वैनगंगेला आलेल्या महापुराने व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्र आपल्या कवेत घेतल्याने अनेक राईस मिलचे तसेच शैक्षणिक संस्थाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात असलेल्या गजानन राईस मिलसह अनेक राईस मिलमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने धान, तांदूळ, कुकुस, कोंडा तसेच मशनरी महापुराच्या विळख्यात सापडले होते. धान, तांदूळ, कुकुस, कोंडा हे पाण्यात राहून कुजून गेले आहेत तर इलेक्ट्रॉनिक मशनरीमध्ये पाणी गेल्याने मशिनरी पूर्णत: खराब झाल्या आहेत. महापुराच्या तडाख्यात जवळपास तालुक्यातील १० ते १५ राईस मिल सापडल्या होत्या. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रालासुद्धा महापुराचा जबरदस्त फटका बसला. बेटाळा फाट्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात महापुराचे पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे तसेच संगणक आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णत: खराब झाले आहेत. यात संस्था चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, मॉनिटर पूर्णत: खराब झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भविष्यात यामुळे मोठी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने नुकसान भरपाईचे सर्व्हे करताना व्यवसायिक व शैक्षणिक क्षेत्राचेसुद्धा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यावसायिक व शैक्षणिक संस्था चालकांनी केली आहे.तालुक्यातील एकूण पूरग्रस्तांपैकी ४७०० लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून लाडज येथील जवळपास ४०० लोकांचे कागदपत्रआभावी पाच हजार रुपयांची मदत बँक खात्यात टाकण्यास विलंब झाला आहे. एक-दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.- क्रांती डोंबे, उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर