काँग्रेस पक्षाचे नेतृत्व : अधिकारी मात्र गायबराजुरा : येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या घरकूल योजना लाभार्थ्यांना अपात्र केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भर उन्हात पंचायत समिती राजुराच्या आवारात काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अब्दुल जमीर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. सवंर्ग विकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे हे अर्ज न देता रजेवर असल्याचे सभापती निर्मल कुळमेथे यांनी सांगितले. तीन तास भर उन्हात शेकडो घरकुल लाभार्थी धरणे आंदोलन करीत होते. शेवटी प्रभारी संवर्ग विकास अधिकारी यांनी १५ दिवस मुदत देऊन पूर्णकालीन करण्याचे लिखित आश्वासन दिले. तेव्हा धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकूल योजनेत अपात्र ठरविण्यात आल्याने आंदोलन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
घरकूल लाभार्थ्यांना अपात्र ठरविल्याने राजुऱ्यात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:45 IST