शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

महामारीमुळे होळीचे रंग यंदाही फिकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून वर्षभरामध्ये तब्बल ४२० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती तसेच विविध उपाययोजना केल्या आहे. त्यात्याच एक भाग म्हणून गर्दी जमविण्यावर तसेच सण समारंभावरही निर्बंध घालण्यात आले आहे. एवढेच नाही तर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र नागरिक फारसे गंभीर नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट : साध्या पद्धतीने करावा लागणार सण साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, बाजारपेठेमध्येही पाहीजे तसा उत्साह नसल्यामुळे छोट्या, मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. रंगपंचनीच्या पूर्वसंधेलाही व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही निरुत्साह बघायला मिळाला. त्यामुळे होळीचे रंग यावर्षीही उडालेलेच आहे.होळी सणावर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मर्यादा आली आहे. कोरोनाच्या सावटामध्येच होळी साजरी करावी लागणार असल्याने रंग खेळण्याचा आनंदही घेता येणार नाही.काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून वर्षभरामध्ये तब्बल ४२० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती तसेच विविध उपाययोजना केल्या आहे. त्यात्याच एक भाग म्हणून गर्दी जमविण्यावर तसेच सण समारंभावरही निर्बंध घालण्यात आले आहे. एवढेच नाही तर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र नागरिक फारसे गंभीर नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. होळीनिमित्त नागरिक रंगोत्सव साजरा करतात. यासाठी काही गावांत सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाते. मात्र यावरही निर्बंध आले आहे.यावर्षी कोरोनाचे सावट घोंघावत आहे. घराबाहेर पडताना संसर्गाची धास्ती वाढत आहे. त्यामुळे होळी घरच्या घरीच साजरी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. परिणामी बाजारपेठेमध्येही निरुत्साह बघायला मिळत आहे. 

पोलिसांचा बंदोबस्तकोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे तसेच होळीनिमीत्त गर्दी लक्षात घेता चंद्रपूर शहरातील विविध चौकामध्ये सायंकाळच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.  दरम्यान सायंकाळी संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. जटपुरा गेट, गांधी चौक तसेच गोलबारातही पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. परिणामी व्यावसायिकांनी  दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले.

लहान व्यावसायिकांचे नुकसानमागील वर्षी तसेच यावर्षीही कोरोनाचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांसोबत लहान व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकजण चौकाचौकात रंग, पिचकारी तसेच अन्य साहित्य विकून संसाराला हातभार लावत होते. मात्र यावर्षीही त्यांचे नुकसान झाले असून अनेकांनी हा व्यवसायही बंद केला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीचे अनेक साहित्य यावर्षी विक्रीसाठी काढण्यात आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHoliहोळी