शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रोगट कापसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:07 IST

जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देकाम करण्यास मजुरांचा नकारजिनिंग संचालकांसमोर नवे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रार्दुभाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन फार कमी झाले. त्यानंतरही कापसावरील संकट थांबता थांबत नसून सरकीमधून निघणाऱ्या तेलातही बोंड अळीने शिरकाव केला आहे. परिणामी तेलाचे उत्पन्न कमी होवून ढेपही निकृष्ठ दर्जाची झाली आहे. आता जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.वरोरा परिसर हा मुख्य कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जातो. वरोरा परिसरात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस आणत असल्याने अनेकांनी जिनिंग व्यवसाय सुरू केला. गतवर्षी कपाशीच्या पेºयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र कापूस पिकावर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेकांना उत्पन्न कमी झाले.कापसाचे दर वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात भरुन ठेवला. मात्र बोंडअळीग्रस्त कापूस घरात असल्याने कुटुंबियास त्वचा रोगाने ग्रासले आहे. मात्र उन्हाळा सुरू झाल्याने कापसाच्या वजनात घट होईल, या भीतीने अनेक शेतकरी सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विकायला सुरूवात केली आहे. परिणामी जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली आहे.कापसाची उचल करून जिनिंग करण्याच्या कामात शेकडो मजूर रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र या मजुरांना त्वचा रोगाने ग्रासल्याने मजूर घाबरून आहेत. त्यांना वैद्यकीय उपचार करण्याकरिता वेळ व पैसाही लागत असल्याने अनेक मजूर जिनिंगमध्ये काम करण्यास नकार देत आहे. परिणामी जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे.

टॅग्स :cottonकापूस