शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जुन्या चंद्रपूरवरच्या भाराला उदासीनता कारणीभूत

By admin | Updated: November 20, 2014 22:48 IST

तब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात

पूरक्षेत्रात वाढतेयं वस्ती : पराकोटात माणसांची दाटीगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरतब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात माणसांची आणि वाहनांची दाटी झाली आहे. या दाटलेल्या वस्तीचा पूर आता चक्क पूरग्रस्त क्षेत्रातही पोहचल्याने भविष्यात चंद्रपूर महानगर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.चंद्रपूरचा नियोजन आराखडा नगर रचना विभागाने आखला असला तरी तो राबविलेला कुठेच दिसत नाही. गेल्या २० वर्षात त्याची अंमलबजावणीच न झाल्याने शहराची अवस्था विकोपाला गेली आहे. जनप्रतिनिधींनीही या विषयाकडे कधीच गांभीर्याने न पाहिल्याने जनता त्यांनाही दोषाचे वाटेकरी मानत आहेत. पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २५० कोटींचा निधी घोषित झाला होता. मात्र मिळालेल्या २५ कोटी रूपयांचा पूर्ण खर्चही प्रशासनाला आणि महानगरपालिकेला करता आला नाही. आता तर, या २५० कोटींच्या निधीची फाईलच बंद झाल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचा निधी पदरात पडेपर्यंत विकासाचे भविष्य धूसरच आहे.चंद्रपूरच्या विकासाची ही अवस्था लक्षात घेऊन १९९३ मध्ये जुळ्या चंद्रपूरची आखणी करण्यात आली. त्यावर खर्चही झाला. मात्र हा विषय नागरिकांच्या मनात उतरविण्याचे म्हणावे तसे प्रयत्न प्रशानसाकडून झालेच नाही. परिणामत: शहरातील वाढती वस्ती जुळ्या चंद्रपूरकडे प्रवाहित झालीच नाही. पराकोटातील आहे त्याच मर्यादित जागेत जनता वास्तव्याला राहिली. या स्थितीचा फायदा घेत सक्रिय झालेल्या बिल्डर लॉबीने चक्क पूरप्रवण क्षेत्रात वसाहतीसाठी प्लॉट पाडले. सदनिका उभारल्या. महत्वाचे म्हणजे या सदनिकांना महानगर पालिकेने परवानगीही दिली. पराकोटाबाहेरील पठाणपुरा गेट, बिनबा गेट बाहेरील भूखंड आणि सदनिकांची योजना हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे.कोट्यवधी रूपये खर्च करून जुळ्या चंद्रपूरमध्ये वसाहत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी खुटाळा, दाताळा, कोसारा, लखमापूर रिठ या गावांचा अंतर्भाव करण्यात आला, हेसुद्धा खरे आहे. मात्र या परिसरात वसाहत वाढावी, यासाठी प्रयत्न मात्र कुणीही केले नाहीत. एमआयडीसीसाठी पुरक ठरू पहाणाऱ्या या नव्या वसाहतीमध्ये लोकवस्ती वाढावी, यासाठी जनप्रतिनिधींनीही आजवर नेटाने प्रयत्न केले नाही. अधिकाऱ्यांचीही सदैव कमतरता राहिली. त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावाने नवे चंद्रपूर ओसाडच राहिले.