शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पशुधन घटल्याने मशागतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:47 IST

दिवसेंदिवस पशुधनामध्ये झपाट्याने घट झाल्यामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना आता यांत्रिकी साधनांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही दिवसापूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी सद्या खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत.

ठळक मुद्देपहाटेपासून शेतीची कामे : खरीपपूर्व मशागत, उन्हामुळे दुपारच्यावेळी विश्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस पशुधनामध्ये झपाट्याने घट झाल्यामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना आता यांत्रिकी साधनांवर अवलंबून रहावे लागत आहे.काही दिवसापूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी सद्या खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सद्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांतील शेतीमध्येशेतकरी व मजुरांची गर्दी वाढली आहे.खरीप पूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे, अक्षयतृतीया सणानंतर या कामाला वेग येतो. त्यातच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतातील पाळीवर उरलेले तूर व कपाशीच्या देठ तसेच शेतातील तणस काढण्याचे काम सुुरू असून अनेक शेतकरी बैल जोडीद्वारे शेणखत टाकत आहेत. काही वर्षापासून पाऊस उशीरा येत आहे. त्यामुळे पेरणी, मळणी ही कामे लांबतात. परिणामी शेती उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत आहे. धानाला मिळणारा भाव मात्र अद्यापही ज्वलंत समस्या आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीतून पिकाला लागणारा खर्च वजा करता धानाची विक्री करून हातात काहीच शिल्लक राहत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तीन ते चार दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले परंतु शेती विभागली, मनुष्याबळ कामी झाले. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाले.यांत्रिकी साधने वाढलेकाही वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हशी, शेळ्या यासारखी जनावरे होती. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले. प्रत्येक गावामध्ये यांत्रिक साधने असले तरी वेळीच ती उपलब्ध होत नाही. परिणाम शेतकºयांना मशागतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती