शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

दारूविक्रेते, रेती तस्कर, गुटखामाफिया एलसीबीच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध गट तयार करण्यात आले असून, अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. बल्लारपूर पोलीस स्थानक हद्दीतील कारवा जंगल परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून २१ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी बापू रंगारी धम्मदीप चौक, अनिल मारशेट्टीवार बुद्धनगर, निखील रणदिवे, श्रीकांत कोडबल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३३ लाखांचा मुद्देमाल जप्त : दोन दिवसांत आठ ठिकाणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुविक्रेते, रेती तस्कर व गुटखामाफियाविरूद्ध धाडसत्र सुरू केले आहे. मागील दोन दिवसांत आठ ठिकाणी कारवाई करून अवैध दारू, रेती व सुंगधीत तंबाखू असा सुमारे ३२ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसत्राने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध गट तयार करण्यात आले असून, अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. बल्लारपूर पोलीस स्थानक हद्दीतील कारवा जंगल परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून २१ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी बापू रंगारी धम्मदीप चौक, अनिल मारशेट्टीवार बुद्धनगर, निखील रणदिवे, श्रीकांत कोडबल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमूर येथे सुंगधीत तंबाखू साठवून त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोहर पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गापूर पोलीस स्थानक हद्दीत चार ठिकाणी कारवाई करून दोन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून भागीरथ ठाकूर समतानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शेगाव रोड फाट्यावर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह सात लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसात आठ ठिकाणी केलेल्या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, सुरेश केमेकर, पंडित वऱ्हाडे, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमजद खान, चंदू नागरे, सुरेंद्र महोतो,  गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, कुंदनसिंह बावरी, प्रदीप मडावी, मयुर येरमे, गणेश मोहुर्ले, प्रांजल झिलपे आदींनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी