शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
4
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
5
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
6
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
7
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
8
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
9
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
10
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
11
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
12
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
13
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
14
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
16
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
17
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
18
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
19
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
20
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान

कारच्या बोनेटमध्ये शिरला अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

अनुप माथनकर व अविनाश रोडे हे वडगाव येथील रहिवासी असून गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ऊर्जानगरकडून होंडा सिटी या गाडीने शेतावरून परत येत असताना समोर एक भला मोठा अजगर साप त्यांच्या गाडी समोर आला. त्यांनी लगेच गाडी थांबवली. नंतर खाली उतरून बघितले असता त्यांना साप दिसला नाही. म्हणून गाडीचे बोनेट उघडून पाहिले असता तो अजगर त्यांना तिथे आढळला.

ठळक मुद्देइंजिनमध्ये फसल्याने कारला गॅरेजमध्ये नेऊन अजगराला जीवदान

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उर्जानगरकडून वडगावकडे येत असलेल्या होंडा सिटी कारच्या बोनेटमध्ये चक्क अजगराने ठाण मांडले होते. हा प्रकार गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. हे बघून कारचालकाने तत्काळ सर्पमित्राला बोलावले. मात्र अजगर मोठा असून इंजिनमध्ये फसला होता. त्यामुळे अखेर वाहन गॅरेजमध्ये नेऊन अजगराला बाहेर काढावे लागले. अनुप माथनकर व अविनाश रोडे हे वडगाव येथील रहिवासी असून गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ऊर्जानगरकडून होंडा सिटी या गाडीने शेतावरून परत येत असताना समोर एक भला मोठा अजगर साप त्यांच्या गाडी समोर आला. त्यांनी लगेच गाडी थांबवली. नंतर खाली उतरून बघितले असता त्यांना साप दिसला नाही. म्हणून गाडीचे बोनेट उघडून पाहिले असता तो अजगर त्यांना तिथे आढळला. घाबरून लगेच बोनेट बंद करून सर्प मित्र साईनाथ चौधरी व अमित देशमुख यांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली, अमित देशमुख, सुरज डहाके हे घटनास्थळी पोहोचून बोनेटमधून काढण्याचा प्रयत्न करते होते. पण अजगर हा मोठा असल्याने तो गाडीच्या इंजिनमध्ये फसला होता. खूप प्रयत्न करूनसुद्धा अजगर साप निघत नव्हता. शेवटी हतबल होऊन रात्री १:३० वाजताच्या सुमारास एका गाडीच्या साहाय्याने ऊर्जानगर येथील गॅरेजमध्ये गाडी नेण्यात आली. देशमुख या सुरज डहाके यांनी पुन्हा प्रयत्न सुरु करून त्या अजगराला शुकवारी पहाटे ५ वाजता गाडीच्या बोनेटमधून बाहेर काढण्यात यश आले. सदर अजगर तब्बल ९ फुटाचा होता. सकाळी वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक तावडे व फॉरेस्ट गार्ड दहेगावकर यांच्या उपस्थितीत अजगराला निसर्गमुक्त करण्यात आले.

शेतातही अजगरमागील काही महिन्यात जिल्ह्यात अचानक अजगरांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वीही अनेक भागात अजगर आढळून आला आहे. एवढेच नव्हे तर अनेक शेतकरऱ्यांच्या शेतातही अजगराचे वास्तव्य दिसून आले आहे. हे अजगर ताडोबा जंगलातून येत असावे, असा अंदाज आहे.

 

टॅग्स :snakeसाप