लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या सव्वा महिन्यापासून पायदळ गावाकडे जाणाऱ्या मजुरांचे लोंढे सुरूच आहेत. शासन वारंवार मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहचविण्याची हमी देत असतानाही मजूर पायदळच आपल्या गावांकडे निघाल्याचे दररोज येणाºया मजुरांच्या लोढ्यावरून दिसून येते.शनिवारी १२ मजुरांचा एक घोळका नागपूरमार्गे शिवनीकडे तर २० ते २५ मजुरांचा समावेश असलेले दोन घोळके बालाघाटकडे रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन सुरू केल्यानंतर दळणवळणाची सर्व साधने बंद झाली. कामेही बंद पडली म्हणून या मजुरांनी आपल्या मूळ गावाकडे स्थलांतर करणे सुरू केले. जवळजवळ सव्वा महिन्यांपासून मजुरांचे हे स्थलांतर सुरू आहे. नागभीडमार्गे बालाघाटकडे रोज शेकडो मजूर स्थलांतर करीत आहेत. याशिवाय पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांनी आजपर्यंत हजारो मजूर गेल्याची माहिती आहे.शासनाने रेल्वे आणि बसद्वारे मजुरांना त्यांच्या गावी पोहचवून देण्याची योजना आखली असली तरी अनेक मजुरांना या योजनेची माहिती नाही. त्यामुळेच हे मजूर ७०० ते ८०० किमीचे अंतर पायदळ पूर्ण करीत आहेत.
गावाकडे पायी जाणाऱ्या मजुरांचे लोंढे थांबेच ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST