शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:27 AM

शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआधार लिंकची डोकेदुखी : अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार

राकेश बोरकुंडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. आधार लिंकच्या अटीमुळे सेतू केंद्र किंवा सायबर कॅफे चालकही विद्यार्थ्यांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहेत.सध्या बहुतेक सायबर कॅफेवर शेतकºयाची गर्दी दिसून येत असून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागल्या आहेत. यातच शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांचीही गर्दी वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुंटुबातील आहेत. त्यामुळे एकाच वेळी आई-वडील कर्जमाफीच्या अर्जासाठी दोघेही आवश्यक असल्याने मुंलाना या केंद्रावर जावे लागत असल्याचे दिसते. शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करण्यात सर्वात मोठी अडचण मोबाईल क्रमांक व आधार लिकची येत आहे. ही अट यापूर्वी नव्हती. त्यामुळे कोणत्याही आॅनलाईन यंत्रेणचा आधार घेवून विद्यार्थी आपल अर्ज दाखल करू शकत होता.परंतु, यावेळी पोर्टल बदल्याने शासनाने ही नवी अट लागू केल्याचे समाजकल्याण विभागाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक लिंक झाल्यानंतरच विद्यार्थ्याची लॉगीन आयडी उघडली जाते. त्यातही पुर्वीप्रमाणे मॅहाईसकॉल सारखे महाडीबीटी हे नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या चकरासीमकार्ड विकणाºया कंपन्यांना शासनाने आयडी अर्निवार्य केले आहे. परिणामी विविध दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना बोलावून त्यांचा आधार क्रमांक घेवून बोटाचे ठसे नोंदवीत आहेत. विशिष्ट डिव्हाइस वापरून केल्या जाणाºया या कृतीमुळे आपसुकच आपला मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जातो. मात्र ही लिंक शिष्यवृतीचा अर्ज भरताना उपयोगी पडत नाही. त्यासाठी सेतू केंद्रावर जावून आधारच्या संकेतस्थळावरच मोबाईल क्रमांक जोडवा लागतो. या गुंतागुंतीमुळे अनेकांना दररोज सेतुकेंद्रावर चकरा माराव्या लागत आहे. एवढी पायपीट करूनही विद्यार्थ्यांची निराशा होत आहे.