शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

कुत्र्याला इंजेक्शन द्यायचे कारण सांगून मागितली सिरिंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून घराबाहेर निघाल्या नव्हत्या, अशी माहिती सूत्राने ...

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून घराबाहेर निघाल्या नव्हत्या, अशी माहिती सूत्राने दिली. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या; परंतु मृत्यूच्या दिवशी मात्र त्या बाहेरच आल्या नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली.

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही मृत्यूचे गूढ उकलले नाही; परंतु डाॅ. शीतल आमटे यांनी मृत्यूपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून सिरिंज मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे. मात्र, त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. यामुळे अद्याप मृत्यूचे कारण रहस्यमय बनले आहे. मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही तोपर्यंत डाॅ. शीतल आमटे यांची आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणाने केली, याचा शोध लावणे अवघड झाले आहे. डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली वा अन्य कारणाने मृत्यू झाला, याचाच शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाईल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. याचा ताळमेळ डाॅ. शीतल यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाशी जोडण्याचे काम पोलीस करीत असल्याचे समजते.

पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

डाॅ. शीतल यांच्या मृत्यूप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी काही पुरावे चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कुत्र्याचे इंजेक्शन घेतल्याची अफवा

डाॅ. शीतल आमटे यांनी कुत्र्याला मारण्याचे इंजेक्शन घेतल्याची अफ‌वा होती. याची शहानिशा केली असता ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी डाॅ. शीतल यांनी आनंदवनातील रुग्णालयातून कुत्र्याला इंजेक्शन द्यायचे असल्याचे कारण सांगून सिरिंज मागितल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. ते औषध नेमके कोणते याचाच उलगडा अद्याप न झाल्याने ही अफ‌वा हास्यास्पद असल्याचेही सूत्राने सांगितले.