शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर करणार काम बंद आंदोलन

By admin | Updated: May 24, 2014 23:28 IST

शासनाने आश्‍वासन देऊन ३ वर्षे लोटले. मात्र अद्यापही विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने मॅग्मो संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २७ मेपासून असहकार व २ जूनपासून काम बंद

पत्रकार परिषद : मागण्यांची पूर्तता करण्याची मॅग्मो संघटनेची मागणी

चंद्रपूर : शासनाने आश्‍वासन देऊन ३ वर्षे लोटले. मात्र अद्यापही विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने मॅग्मो संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २७ मेपासून असहकार व २ जूनपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यात जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयातील सुमारे २00 ते २५0 वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश नगराळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यामुळेच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समस्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच आरोग्य विभागाकडे सेवा देण्यासाठी नवीन डॉक्टरांमध्ये निरूत्साह दिसून येतो. मागील ३ वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांना निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. संबंधितांकडून मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्‍वासन दिल्या गेले. परंतु अद्याप मागण्या पूर्णत्वास आल्या नसल्याचेही ते म्हणाले.

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी झाली नाही तर, २७ मे पासून असहकार, तर २ जूनपासून काम बंद आंदोलन संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अँलोपॅथी दवाखान्यातील सुमारे २00 ते २५0 वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ढेपाळल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही डॉ. नगराळे यांनी सांगितले. २00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्ष लाभ मिळावा. ७८९ बीएएमएस व ३२ बीडीएस या अस्थायी कर्मचार्‍यांची सेवा समावेशन करण्यात यावे, २00६ पासून ६ व्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना केंद्र शासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला डॉ. संदीप गेडाम, डॉ. आनंद किन्नाके, डॉ. उत्तम पाटील, डॉ. मेश्राम, डॉ. सुहास इंगळे, डॉ. किशोर भट्टाचार्य आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)