एका डॉक्टरवर ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:32 AM2018-02-03T01:32:41+5:302018-02-03T01:33:01+5:30

१११ गावांसाठी सावली येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. परंतु येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असून एकाच डॉक्टरवर रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Doctor of Rural Hospital in a Doctor | एका डॉक्टरवर ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा

एका डॉक्टरवर ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा

Next
ठळक मुद्देसावली तालुका : रूग्णांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : १११ गावांसाठी सावली येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. परंतु येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असून एकाच डॉक्टरवर रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी, एक औषधी वितरक, सफाई कामगार अशी अनेक पदे रिक्त आहेत. मात्र अतिमहत्त्वाच्या आरोग्य सेवेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या एकच प्रभारी वैद्यकीय अधीक्षक या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत.
ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गंभीर रुग्णांना विविध अडचणींमुळे संदर्भ सेवा घेण्यासाठी गडचिरोली किंवा चंद्रपूर येथे पाठवित जाते. शेजारच्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आठ ते दहा वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात एकच आणि तेही प्रतिनियुक्ती असलेल्या प्रभारी महिला अधिकारी आहेत. येथील रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणाच आजारी पडली काय, असे उपहासाने बोलले जात आहे. सावली नगर हे संवेदनशिल असल्यामुळे कोणत्या प्रसंगी काय घडेल, याची वाट बघण्यापेक्षा या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची पदे त्वरीत भरुन सावली तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला न्याय देण्याची होत आहे.
क्ष-किरण यंत्र धूळ खात
आंतर रुग्ण आणि बाह्य रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर ‘क्ष’ किरण तंत्रज्ञ असूनही प्रशिक्षित नसल्यामुळे ते यंत्र वर्षभरापासून धूळखात पडले आहे. राष्टÑीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सावली तालुक्यात चमू असतानाही दोन वैद्यकीय अधिकाºयांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यातील एकमेव अधिकारी ग्रामीण रुग्णालयात सेवा देत आहे.

Web Title: Doctor of Rural Hospital in a Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.