सुधीर मुनगंटीवार : ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचे वितरण
चंद्रपूर : कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता सामना करण्यासाठी आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. संकटसमयी मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता भाजपचाच कार्यकर्ता असतो, अशी आपली ओळख आहे. ही ओळख जपत आपल्याला कार्य करायचे आहे. कोरोनाकाळात नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला, तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू, असे मत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ९ ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचे वितरण करण्यात आले. यात प्रामुख्याने दुर्गापूरसाठी ३ , जिवती २, वरोरा २, गडचांदूर २ असे एकूण ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर वितरित केले. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, हनुमान काकडे, गौतम निमगडे, जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, दत्ताजी राठोड, तिरुपती कुंडगिर, सुधाकर राठोड, वरोरा येथील भाजप नेते बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, जगदीश तोटावार, गडचांदूर येथील सतीश उपलेंचवार, रामसेवक मोरे, नत्थू नक्षीणे यांची उपस्थिती होती.
यापूर्वीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा, घुग्गुस, मानोरा, नकोडा, पांढरकवडा, ताडाळी, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती आदी ठिकाणी ८८ ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर वितरित केले आहेत. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
मानले.